Multibagger Stock
Multibagger Stock

Multibagger Stock :  मल्टीबॅगर स्टॉक हे गुंतवणुकदारांना तूफान नफा देत असतात. शेअर मार्केटमध्ये असे अनेक मल्टीबॅगर स्टॉक्स आहेत जे तुम्हाला भरपूर परतावा देऊन करोडपती बनवू शकतात.

आज आपण अशाच एका मल्टीबॅगर स्टॉक बाबत जाणून घेणार आहोत. अशातच एका केमिकल कंपनीच्या शेअर्सने घसघशीत परतावा दिला आहे. या कंपनीच्या शेअर्सने लोकांना 200,000 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे.

ही कंपनी विनती ऑरगॅनिक्स आहे. कंपनीचे शेअर्स 75 पैशांवरून 2,000 रुपयांपर्यंत वाढले आहेत. कंपनीच्या शेअर्समध्ये केवळ 1 लाख रुपये ठेवणारे लोक करोडपती झाले आहेत.

विनती ऑरगॅनिक्स शेअर्सचा 52 आठवड्यांचा उच्चांक रु 2,289.55 आहे. 7 नोव्हेंबर 2003 रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) मध्ये विनती ऑरगॅनिक्सचे शेअर्स 75 पैशांच्या पातळीवर होते.

कंपनीचे शेअर्स 19 मे 2022 रोजी बीएसईवर 2046.10 रुपयांच्या पातळीवर बंद झाले आहेत. या कालावधीत कंपनीच्या शेअर्सनी 200,000 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे.

जर एखाद्या व्यक्तीने 7 नोव्हेंबर 2003 रोजी कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि त्याची गुंतवणूक कायम ठेवली असती, तर सध्या हे पैसे 27.28 कोटी रुपये झाले असते.

50 ते 2,000 रुपयांचा टप्पा ओलांडलेल्या विनती ऑरगॅनिक्स कंपनीच्या शेअर्सने गेल्या 9 वर्षांपेक्षा कमी कालावधीत जबरदस्त परतावा दिला आहे. विनती ऑरगॅनिक्सचे शेअर्स 50 ते 2,000 रुपयांच्या पुढे गेले आहेत.

6 सप्टेंबर 2013 रोजी कंपनीचे शेअर्स 44.58 रुपयांच्या पातळीवर होते. 19 मे 2022 रोजी कंपनीचे शेअर्स 2,046.10 रुपयांवर बंद झाले.

जर एखाद्या व्यक्तीने 6 सप्टेंबर 2013 रोजी कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती आणि त्याची गुंतवणूक कायम ठेवली असती, तर सध्या हे पैसे 45.89 लाख रुपये झाले असते.