Motorola Smartphone :  मोटोरोला (Motorola) 8 सप्टेंबर रोजी भारतात (India) लॉन्च इव्हेंट करणार आहे. या इव्हेंटमध्ये कंपनी आपले तीन नवीन हँडसेट (three new handsets) लॉन्च करणार आहे.

लॉन्च केल्या जाणार्‍या या डिवाइसेजमध्ये 200MP कॅमेरा असलेल्या Edge 30 Ultra व्यतिरिक्त Edge 30 Fusion आणि Edge 30 Neo यांचा समावेश आहे. Moto Edge 30 Ultra हा 200 मेगापिक्सेल कॅमेरा असलेला भारतातील पहिला स्मार्टफोन असेल. चीनमध्ये लॉन्च झालेल्या Moto X30 Pro चा हा रिब्रँडेड वर्जन आहे.


BIS प्रमाणित
भारतात लाँच होण्यापूर्वी, हा फोन बीआयएस अर्थात ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्सने (Bureau of Indian Standards) प्रमाणित केला आहे. टिपस्टर अभिषेक यादवने त्याच्या ट्विटर हँडलवरून बीआयएस प्रमाणपत्राविषयी माहिती दिली. टिपस्टरनुसार, या मोटो फोनचा मॉडेल नंबर XT2241-2 आहे. BIS सूचीमध्ये फोनच्या फीचर्सबद्दल कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

Moto Edge 30 Ultra फीचर्स आणि स्पेसिफिकेशन
हा फोन गेल्या महिन्यात चीनमध्ये लॉन्च झालेल्या Moto X30 Pro  चा हा रिब्रँडेड वर्जन आहे.  असा विश्वास आहे की कंपनी कोणत्याही बदलाशिवाय मूळ फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्ससह फोन भारतात लॉन्च करेल.

X30 Pro मध्ये कंपनी 6.73-इंचाचा फुल एचडी + पोलेड डिस्प्ले देत आहे. कर्व्ड एजसह येणाऱ्या या डिस्प्लेचा रिफ्रेश दर 144Hz आहे. फोनचे बेझल खूपच स्लिम आहेत, ज्यामुळे त्याचा लूक खूपच प्रिमियम आहे.

फोन 12GB पर्यंत LPDDR5 रॅम आणि 512GB पर्यंत UFS 3.1 स्टोरेजसह येतो. प्रोसेसर म्हणून, कंपनी त्यात एक पावरफुल स्नॅपड्रॅगन 8+ Gen 1 चिपसेट देत आहे. फोनचे सर्वात मोठे फीचर्स म्हणजे कॅमेरा सेटअप.

फोनच्या मागील बाजूस फोटोग्राफीसाठी एलईडी फ्लॅशसह तीन कॅमेरे आहेत. यामध्ये 50-मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड अँगलसह 200-मेगापिक्सेलचा प्राथमिक कॅमेरा आणि 12-मेगापिक्सेल टेलिफोटो लेन्सचा समावेश आहे.

सेल्फीसाठी फोनमध्ये 60-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरने सुसज्ज असलेला हा फोन 4500mAh बॅटरीने समर्थित आहे. ही बॅटरी 125 W च्या जलद चार्जिंगला सपोर्ट करते. कंपनीचा दावा आहे की हे चार्जिंग टेक्नोलॉजी पूर्णपणे चार्ज होण्यासाठी फक्त 19 मिनिटे लागतात. फोनचे आणखी एक फीचर्स म्हणजे ते 50W वायरलेस फास्ट चार्जिंगला देखील सपोर्ट करते.