Maruti Suzuki Car
Maruti Suzuki Car

MHLive24 टीम, 04 एप्रिल 2022 :- Maruti Suzuki Car : सर्वसामान्य व्यक्ती आपले आर्थिक बजेट सांभाळून प्रत्येक व्यवहार करत असतो. अशा व्यक्ती कोणतेही आर्थिक व्यवहार करण्यापूर्वी आपल्या छोट्या-छोट्या गोष्टींचा हिशोब करून व्यवहार करतात. आजच्या महागाईच्या काळात सर्वसामान्य लोकांना वाढती महागाई ही डोकेदुखी ठरत आहे.

अशातच जर तुम्हाला उत्कृष्ट कार कमी पैशात खरेदी करायची असेल तर आज आम्ही तुम्हाला चांगल्या स्थितीत उपलब्ध असलेल्या काही सर्वोत्तम कारबद्दल सांगणार आहोत. या गाड्या मारुतीच्या वापरलेल्या कार विक्री करणाऱ्या वेबसाइट मारुती ट्रू व्हॅल्यू शॉपवर विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

मारुती सुझुकी अल्टो LX:

मारुती सुझुकी अल्टो LX चे 2007 चे पेट्रोल मॉडेल या वेबसाइटवर विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. ही तिसरी मालकीची कार आहे आणि ती 98,914 किलोमीटर चालवली गेली आहे. कार मॅन्युअल ट्रान्समिशनसह येते आणि ग्रे कलरमध्ये विकली जात आहे. तुम्ही ही कार रेवाडी येथून ₹ 45,000 मध्ये खरेदी करू शकता.

मारुती सुझुकी वॅगनआर:

मारुती सुझुकी वॅगनआरचे 2008 चे पेट्रोल मॉडेल या वेबसाइटवर विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. ही मालकीची पहिली कार आहे आणि ती 1,84,660 किमी चालवली गेली आहे. कार मॅन्युअल ट्रान्समिशनसह येते आणि ग्रे कलरमध्ये विकली जात आहे. तुम्ही ही कार पलवल येथून ₹52,000 मध्ये खरेदी करू शकता.

मारुती सुझुकी ए स्टार VXI:

मारुती सुझुकी A Star VXI चे 2009 चे पेट्रोल मॉडेल या वेबसाइटवर विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. ही दुसरी मालकीची कार आहे आणि ती 79,685 किलोमीटर चालवली गेली आहे. कार मॅन्युअल ट्रान्समिशनसह येते आणि पांढर्‍या रंगात विकली जात आहे. तुम्ही ही कार फरीदाबाद येथून ₹ 73,000 मध्ये खरेदी करू शकता.

मारुती सुझुकी रिट्झ LDI:

मारुती सुझुकी रिट्झ एलडीआयचे 2011 चे डिझेल मॉडेल या वेबसाइटवर विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. ही तिसरी मालकीची कार आहे आणि ती 1,69,315 किमी चालवली गेली आहे. कार मॅन्युअल ट्रान्समिशनसह येते आणि ग्रे कलरमध्ये विकली जात आहे. ही कार तुम्ही मानेसर येथून ₹ 1,15,000 मध्ये खरेदी करू शकता.

मारुती सुझुकी स्विफ्ट LXI:

मारुती सुझुकी स्विफ्ट LXI चे 2008 चे पेट्रोल मॉडेल या वेबसाइटवर विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. ही दुसरी मालकीची कार आहे आणि ती 84,886 किलोमीटर चालवली गेली आहे. कार मॅन्युअल ट्रान्समिशनसह येते आणि ग्रे कलरमध्ये विकली जात आहे. तुम्ही ही कार गाझियाबाद येथून ₹ 1,25,000 मध्ये खरेदी करू शकता.

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup