Mhlive24 टीम, 20 ऑक्टोबर 2020 :- राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्ष रेखा शर्मा या महाराष्ट्र दौऱ्यावर असताना राज्यातील प्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच महिला व बालकल्याण मंत्री ते भेटत नाही.

तसेच मुंबईतील भाजपच्या नेत्यांशी महिला आयोगाच्या अध्यक्ष भेटी घेतात हा एका प्रकारे महाराष्ट्राचा अपमान आहे, असे परखड मत राज्याचे महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केले आहे.

केंद्रीय महिला आयोगाच्या प्रमुख या महाराष्ट्र दौऱ्यावर असताना सुद्धा राज्यातील कोणत्याही प्रमुख काही भेट घेत नाही ते भाजपच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतात हा त्यांचा दौरा पक्षीय दौरा होता का ? असा प्रश्न येथे निर्माण होत आहे.

काल रात्री महिला आयोगाकडून भेटण्याकरिता फोन आला. आज सकाळी 11 वाजता ही भेट दिली होती, मात्र महिला आयोगाचे प्रमुख राज्यातील मंत्र्यांना भेटा भाजपच्या पदाधिकाऱ्यांना भेटण्यासाठी गेल्या आहे.

राज्यात महिलांचे विषय अनेक आहे केंद्र सरकारने महिलांकरिता लोकलने प्रवास करण्याची अनुमती द्यावी यामध्ये राजकारण करण्याची काहीही आवश्यकता नाही. महिला सुरक्षित प्रवास केला पाहिजेत यासाठी राज्य सरकारने महिलांना लोकलमधून प्रवास करण्याची अनुमती दिलेली आहे.

मात्र भाजपकडून यात राजकारण करण्यात येत आहे अशी टीका महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी केली आहे.

📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत …आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9284295683  हा आमचा नंबर

Mhlive24

Marathi News Updates of Sarkari Yojana, Money, Share Market, Business ideas, Agriculture, Lifestyle and Technology