Mhlive24 टीम, 18 ऑक्टोबर 2020 :-एका रात्रीत आलेल्या भीमानदीच्या पूराच्या पाण्यात ऊस, केळी, पपई यासह इतर अनेक फळझाडांचे नुकसान झाल ,तसेच अतिवृष्टी आणि महापूरामुळे पंढरपूर तालुक्याला भयंकर फटका बसला .

वर्षभर कष्टानं वाढवलेली झाडे डोळ्यादेखत वाहून गेल्याने शेतकऱ्यांच काळीज ही पूराच्या पाण्याने पार हतबल होऊन गेलं आहे.पंढरपूर तालुक्यातील 95 गावातील सुमारे साधारण ३९ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झालं आहे. केळी, पपई या फळ बागांचेही मोठ नुकसान झालं आहे.

चिंचोली भोसे येथील शेतकरी प्रशांत शिंदे यांची तीन एकर केळी पूराच्या पाण्यात वाहून गेली.यामध्ये त्यांचं दहा ते बारा लाखांचे नुकसान झाले आहे. येथीलच निलेश पवार यांची दोन एकर पपईची बाग देखील पुरात बुडाली आहे.

हातातोंडीशी आलेला खास पुराने हिरावून गेल्याने पवार या उमद्या शेतकर्यांचं स्वप्नही पुराच्या पाण्यात वाहून गेलं आहे. निलेशं मोठ्या कष्टाने आणलेली बाग पुराच्या पाण्यामुळे आता कुजू लागली आहे.

महसूल आणि कृषी विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार जवळपास ३७ ते ३९ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांच नुकसान झाले तर भीमानदीकाठच्या जवळपास 25 ते 30 लाख टन ऊसाचे नुकसान झालं आहे.

मागील चार ते पाच दिवसाची अतिवृष्टी आणि उजनी धरणातून भीमानदी पाणी सोडल्याने निर्माण झालेली पूरस्थिती यामध्ये शेतीचीअमानूष हानी झाली आहे. पुरामुळे तालुक्यातील नदीकाठच्या 45 ते 50 गावांना सर्वाधिक फटका बसला आहे.

शेती पिकांबरोरच नदीकाठी असलेल्या घरांचे आणि जनावरांच्या गोठ्यांचे नुकसान झाले आहे. महसूल प्रशासनाच्यामाहिती नुसार जवळपास शहर व तालुक्यातील 14 ते 15 हजार घरांमध्ये पुराचे पाणी घुसले होते. पाण्यामुळे अनेकांचे संसार वाहून गेले.

जवळपास 1 हजार लहान मोठे जनावरे दगावली तर सात जणांचे पुराच्या पाण्यामुळे आणि अतिवृष्टीमुळे प्राण गेले आहेत.पंढरपूर परिसरात पाच ते सहा साखर कारखाने आहेत. दरवर्षी ५० लाख टन उसाचे गाळप केले जाते.

सर्वाधिक ऊस उत्पादक तालुका म्हणून पंढरपूरची ओळख आहे. याच उसाच्या खोर्यात यावर्षी महापूर आणि अतिवृष्टीने हानी केली. ऊसाची पिके मुळासह उपटून वाहून गेली आहेत. तोडणीस आलेला ऊस आडवा झाल्याने शेतकर्यांच्या अक्षरश: पाणी आले आहे.

महसूल विभागाने पंचनामे सुरु केले असले तरी नुकसानीच्या प्रमाणात शेतकऱ्यांना मदत मिळणार का असा प्रश्न आता शेतकरी उपस्थित करु लागले आहेत.

📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत …आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9284295683  हा आमचा नंबर

Mhlive24

Marathi News Updates of Sarkari Yojana, Money, Share Market, Business ideas, Agriculture, Lifestyle and Technology