MHLive24 टीम, 26 जानेवारी 2022 :- ड्रायव्हिंग लायसन्स म्हणजे वाहन मालकासाठी अत्यंत महत्वाचा सरकारी दस्तावेज आहे. ड्रायव्हिंग लायसन्स नसेल तर काय त्रेधा होते हे सांगायची गरज नाही.(Driving Licence)

अशा परिस्थितीत जर तुमच ड्रायव्हिंग लायसन्स हरवल असेल तर तुम्हाला आता काळजी करण्याची किंवा आरटीओ कार्यालयात जाण्याची गरज नाही.

आता डुप्लिकेट ड्रायव्हिंग लायसन्स तुम्ही घरी बसल्याच मिळवू शकता. आजघडीला तुम्ही तुमच डुप्लिकेट ड्रायव्हिंग लायसन्स चुटकीसरशी मिळवू शकता.

हरवल्यास पोलिसांना कळवा

जर तुमच ड्रायव्हिंग लायसन्स हरवल असेल तर सर्वप्रथम पोलिसात तक्रार नोंदवणे अत्यंत गरजेचे आहे. याशिवाय, जर तुमच्या लायसन्सवरील नाव किंवा इतर कोणतीही माहिती पुसली गेली असेल, तर तुम्हाला आधी जुना परवाना सबमिट करावा लागेल, त्यानंतरच तुम्ही नवीन परवान्यासाठी अर्ज करू शकता.

याप्रमाणे ऑनलाइन अर्ज करा

तुम्ही डुप्लिकेट ड्रायव्हिंग लायसन्ससाठी ऑनलाइन किंवा ऑफलाइन अर्ज करू शकता. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी, तुम्हाला प्रथम राज्य परिवहन विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.

या स्टेपचे पालन करा

1. परिवहन विभागाच्या अधिकृत वेबसाइट https://morth.gov.in/ वर दिलेल्या माहितीनुसार, सर्व आवश्यक तपशील भरा.
2. यानंतर, LAD फॉर्म भरा आणि त्याची प्रिंट काढा.
3. आता तुम्हाला सर्व आवश्यक कागदपत्रे जोडावी लागतील.
4. आता तुम्हाला हे सर्व फॉर्म आणि कागदपत्रे फक्त आरटीओ कार्यालयात जमा करावी लागतील.
5. तुम्ही ते ऑनलाइनही सबमिट करू शकता.
6. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर 30 दिवसांनंतर, तुमचा परवाना तयार होईल आणि तुमच्या दिलेल्या पत्त्यावर येईल.

 

ऑफलाइन अर्ज कसा करावा

1. ज्या RTO मधून तुम्हाला मूळ ड्रायव्हिंग लायसन्स देण्यात आले आहे तेथे जाऊन तुम्हाला LLD फॉर्म भरावा लागेल आणि सबमिट करावा लागेल. यासोबतच काही विहित शुल्क देखील भरावे लागणार आहे. या प्रक्रियेच्या 30 दिवसांनंतर तुम्हाला तुमच DL मिळेल.

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup