LIC IPO Update
LIC IPO Update

LIC IPO Update :सध्या LIC IPO बाबत आपण महत्वाची घडामोड घडत आहे. गुंतवणुकदार LIC IPO कडे लक्ष ठेवून आहेत. देशातील सर्वात मोठी विमा कंपनी लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन (LIC) च्या IPO ची लोक आतुरतेने वाट पाहत आहेत.

LIC IPO बद्दल मोठी बातमी समोर आली आहे, त्यामुळे जर तुम्हाला देखील स्वारस्य असेल तर आमची बातमी नक्की वाचा.

अशातच देशातील सर्वात मोठी विमा कंपनी लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (LIC) ची इनिशियल पब्लिक ऑफरिंग (IPO) 4 मे रोजी येईल आणि 9 मे रोजी बंद होईल.

पीटीआय या वृत्तसंस्थेने सोमवारी सायंकाळी उशिरा सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली. पीटीआयच्या अहवालानुसार, एलआयसी आयपीओच्या माध्यमातून सरकार सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीतील 3.5 टक्के हिस्सा विकणार आहे.

त्यामुळे सरकारला 21 हजार कोटी रुपये मिळतील. IPO वर आधारित, LIC चे मूल्यांकन 6 लाख कोटी रुपये आहे. फेब्रुवारीमध्ये सरकारने एलआयसीमधील पाच टक्के स्टेक किंवा 316 कोटी शेअर्स विकण्याची योजना आखली होती.

या संदर्भातील कागदपत्रे सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाकडे (सेबी) सादर करण्यात आली. इश्यूचा आकार कमी करण्याबाबत चर्चा झाली ,

तथापि, रशिया-युक्रेन युद्धामुळे बाजारपेठेतील अस्थिरतेमुळे आयपीओ योजनेत अडथळा निर्माण झाला. गेल्या आठवड्यात, सरकारने इश्यू आकार 3.5 टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा निर्णय घेतला होता. पाच टक्के भागविक्रीच्या नियमातून सूट मिळण्यासाठी सरकारने सेबीला कागदपत्रेही दिली असल्याचे सूत्रांनी सांगितले.

SEBI चे नियम काय आहेत :- SEBI च्या नियमांनुसार, 1 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त मूल्यांकन असलेल्या कंपन्यांना IPO मधील पाच टक्के हिस्सा विकणे आवश्यक आहे.

मिलिमन अॅडव्हायझर्स या आंतरराष्ट्रीय मूल्यांकन कंपनीने 30 सप्टेंबर 2021 रोजी LIC चे मूळ मूल्य 5.4 लाख कोटी रुपये ठरवले होते. गुं

तवणूकदारांकडून मिळालेल्या तपशिलानुसार, LIC चे बाजार मूल्य त्याच्या अंतर्निहित मूल्याच्या 1.1 पट किंवा सुमारे 6 लाख कोटी रुपये आहे.

सरकारने चालू आर्थिक वर्षात निर्गुंतवणुकीतून 65,000 कोटी रुपये उभारण्याचे लक्ष्य ठेवले आहे. यामध्ये एलआयसीच्या आयपीओचा मोठा वाटा असेल.