Mhlive24 टीम, 25 ऑक्टोबर 2020 :-भाजपाला सोडचिठ्ठी देऊन ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंनी शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते एकनाथ खडसेंना प्रवेश देण्यात आला. राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर मी टेन्शन फ्री झालो आहे, असं विधान एकनाथ खडसे यांनी केलं आहे.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण झाल्याचे समजताच एकनाथ खडसे यांनी पत्रकारांशी बोलताना यावर प्रतिक्रिया दिली. “मी टीव्हीवर फडणवीसांना कोरोना झाल्याचं पाहिलं. त्यांना लवकर बरं होण्यासाठी शुभेच्छा,” असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान त्यांनी 12 ते 15 माजी आमदार माझ्या संपर्कात आहेत आणि ते लवकरच राष्ट्रवादीत येतील, असा दावा एकनाथ खडसे यांनी केला आहे. एकनाथ खडसे यांच्या या दाव्यानंतर नेमके कोणते माजी आमदार राष्ट्रवादीत प्रवेश करणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्याचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या नाराजीच्या वृत्तावरही एकनाथ खडसे यांनी भाष्य केलं आहे. अजित पवार आणि जितेंद्र आव्हाड यांच्या नाराजीच्या बातम्या बघून माझी आणि शरद पवारांची खूप करमणूक झाली, असं एकनाथ खडसे यांनी सांगितले.

📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत …आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9284295683  हा आमचा नंबर

Mhlive24

Marathi News Updates of Sarkari Yojana, Money, Share Market, Business ideas, Agriculture, Lifestyle and Technology