Mhlive24 टीम, 23 ऑक्टोबर 2020 :- एकनाथ खडसे यांनी भाजपाचा राजीनामा दिल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे पक्षांतर केल्यानंतर त्यांचा मंत्रिमंडळात समावेश होणार आहे

की त्यांच्याकडे पक्षाची इतर जबाबदारी देण्यात येणार, याबाबत सध्या जोरदार चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, खडसे प्रातिनिधिक स्वरुपात प्रवेश करतील.

त्यांच्या पुनर्वसनाची चिंता कोणीही करू नये. याबातचा निर्णय शरद पवार घेतील, असे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले. इतर पक्षाचे आमदार-खासदारही राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे

या प्रश्नावर उत्तर देताना ते म्हणाले की, आमदार-खासदारांना कधी प्रवेश द्यायचा याचा निर्णय योग्यवेळी घेण्यात येईल. शिक्षक तसेच पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूका होणार त्यासंदर्भात पक्षांतर्गत चर्चा झाली.

या निवडणूकांबाबत शिवसेना तसेच काँग्रेससोबतही चर्चा होईल. एक-दोन दिवसानंतर आपण स्वतः सुभाष देसाई तसेच बाळासाहेब थोरात यांच्यासोबत बैठक घेणार आहोतअसे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

याचबरोबर, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे का? असा प्रश्न जयंत पाटील यांना विचारण्यात आला. यावेळी अजित पवार थोडे आजारी आहेत. त्यांना सर्दीचा त्रास होत आहे. डॉक्टरांनी त्यांना आराम करायला सांगितले आहे असे सांगितले.

📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत …आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9284295683  हा आमचा नंबर

 

Mhlive24

Marathi News Updates of Sarkari Yojana, Money, Share Market, Business ideas, Agriculture, Lifestyle and Technology