Mhlive24 टीम, 20 ऑक्टोबर 2020 :- मुंबईमधील आपल्या माता-भगिनींना रेल्वेची सुविधा मिळावी. ती ही नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून, म्हणजेच 17 तारखेपासूनच मिळावी ही महाविकास आघाडीची इच्छा होती.

रेल्वे अधिकाऱ्यांसोबत चर्चा, बैठका घेऊन हा निर्णय घेण्यात आला होता. 13 तारखेला जी बैठक झाली होती ती अडीच तास बैठक झाली.

त्यामध्ये सविस्तर सर्व विषयांवर चर्चा करण्यात आली होती. सर्व निर्णय झाल्यानंतर सर्व बैठका झाल्यानंतर अचानक असा निर्णय बदलला जातो.

त्यामुळे केंद्र सरकारकडून वरून कोणता दबाव आहे का? असा प्रश्न येथे उपस्थित राहतो, असे मत काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत मांडले आहे.

आतापर्यंत रेल्वेमध्ये प्रवास करणाऱ्या चार लाख लोकांच्या सर्व सुरक्षेचा विचार करण्यात आला होता. त्याच बरोबर जी महिलांसाठी वेळ ही ठरविण्यात आली होती.

11 ते 3 यामध्ये महिलांची संख्या खूप कमी असते, त्यामुळे ही वेळी ठरविण्यात आली होती असे सचिन सावंत म्हणाले.

मंञी पियुष गोयल यांनी आपले मत व्यक्त करावे, कि मुंबईमध्ये आपल्या माता-भगिनींना रेल्वेची सुविधा मिळायला हवी की नको असा सवाल सचिन सावंत यांनी उपस्थित केला आहे.

आणि आमची मागणी आहे की, त्यांनी तात्काळ हा निर्णयाला अंमलात आणावा असे काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत म्हणाले.

📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत …आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9284295683  हा आमचा नंबर

Mhlive24

Marathi News Updates of Sarkari Yojana, Money, Share Market, Business ideas, Agriculture, Lifestyle and Technology