7th pay commission : केंद्र सरकार असा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे की ज्याचा तब्बल लाखो केंद्रीय कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे. होय केंद्र सरकार आता केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने महत्वाचा निर्णय घेणार आहे.

दरम्यान डीएमध्ये 4 टक्के वाढीचा दावा करणारे परिपत्रक बनावट असल्याचे समोर आल्याने केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. एक नवीन निवेदन जारी करून, केंद्र सरकारने ते सर्व अहवाल फेटाळून लावले आहेत, ज्यामध्ये केंद्र सरकारच्या कर्मचार्‍यांचा महागाई भत्ता (DA) वाढवला जाणार असल्याचे सांगितले जात आहे. सरकारच्या म्हणण्यानुसार असा कोणताही प्रस्ताव अद्याप मंजूर झालेला नाही.

फक्त प्रतीक्षा करावी लागेल

सरकारकडून हे निवेदन प्रसिद्ध झाल्यानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांची घोर निराशा झाली आहे. सरकारने डीएमध्ये वाढ करावी, अशी या कर्मचाऱ्यांची अपेक्षा होती.

डीए वाढवण्याचा दावा करणारे परिपत्रक बनावट निघाले

खरं तर, आजकाल एक परिपत्रक व्हॉट्सअॅप आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये केंद्र सरकारकडून केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या डीएममध्ये 4 टक्क्यांनी वाढ केल्याचा दावा करण्यात आला आहे.

व्हायरल झालेल्या परिपत्रकावर सरकारला निवेदन द्यावे लागले

व्हायरल होत असलेल्या या परिपत्रकावर, सरकारने अधिकृत निवेदन जारी केले आणि त्याचे स्पष्टीकरण दिले. असे परिपत्रक काढण्यासही सरकारने नकार दिला आहे.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रसारित करण्यात आलेले परिपत्रक भारत सरकारचे नसून ते बनावट असल्याचे सरकारने स्पष्ट केले. तसेच, आतापर्यंत डीएबाबतचा कोणताही प्रस्ताव मंजूर झाला नसल्याचा दावा सरकारने केला आहे.