MHLive24 टीम, 11 सप्टेंबर 2021 :-  ड्रायव्हिंग लायसन्सशी संबंधित मोठी बातमी आहे. आता तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्ससाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) चकरा मारण्याची गरज भासणार नाही. केंद्र सरकारने ड्रायव्हिंग लायसन्स बनवण्याच्या नियमांमध्ये बदल केला आहे. वास्तविक, सरकारने आता DL ची प्रक्रिया खूप सोपी केली आहे. सरकारच्या या नवीन नियमाबद्दल जाणून घेऊया.(Important news about driving license )

ड्रायव्हिंग टेस्टची आता गरज नाही :-सरकारने ड्रायव्हिंग लायसन्सच्या नियमांमध्ये सुधारणा केली आहे. नव्या नियमानुसार, आता तुम्हाला आरटीओमध्ये जाऊन कोणत्याही प्रकारची ड्रायव्हिंग टेस्ट देण्याची गरज भासणार नाही. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने हे नियम अधिसूचित केले आहेत, हे नियम या महिन्यापासून लागू झाले आहेत. या नवीन बदलामुळे RTO च्या ड्रायव्हिंग लायसन्ससाठी प्रतीक्षा यादीत पडलेल्या कोट्यवधी लोकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

ड्रायव्हिंग स्कूलमध्ये जाणे आणि प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे :- ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी RTO मध्ये त्यांच्या टेस्ट ची वाट पाहत असलेल्या अर्जदारांना मंत्रालयाने याची माहिती दिली आहे. आता ते कोणत्याही मान्यताप्राप्त ड्रायव्हिंग ट्रेनिंग स्कूलमध्ये ड्रायव्हिंग लायसन्ससाठी स्वतःची नोंदणी करू शकतात.

त्यांना ड्रायव्हिंग ट्रेनिंग स्कूलमधून प्रशिक्षण घ्यावे लागेल आणि तेथे परीक्षा उत्तीर्ण करावी लागेल, अर्जदारांना स्कूल कडून प्रमाणपत्र दिले जाईल. या प्रमाणपत्राच्या आधारे अर्जदाराचा ड्रायव्हिंग लायसन्स जारी केला जाईल.

काय आहेत नवीन नियम :- प्रशिक्षण केंद्रांबाबत रस्ते आणि परिवहन मंत्रालयाकडून काही मार्गदर्शक तत्त्वे आणि अटी देखील आहेत. ज्यात प्रशिक्षण केंद्रांच्या क्षेत्रापासून ते प्रशिक्षकाच्या शिक्षणापर्यंतचा समावेश आहे. हे समजून घेऊ.

1. अधिकृत एजन्सी हे सुनिश्चित करेल की दुचाकी, तीन चाकी आणि हलक्या मोटर वाहनांसाठी प्रशिक्षण केंद्रांजवळ किमान एक एकर जमीन आहे, तर मध्यम आणि अवजड प्रवासी माल वाहने किंवा ट्रेलरसाठी केंद्रांना दोन एकर जमीन आवश्यक आहे.

2. प्रशिक्षक किमान 12 वी उत्तीर्ण असावा आणि कमीत कमी पाच वर्षांचा ड्रायव्हिंगचा अनुभव असावा, वाहतूक नियमांमध्ये पारंगत असावा.

3. मंत्रालयाने अध्यापन अभ्यासक्रम देखील निर्धारित केला आहे. हलकी मोटार वाहने चालवण्यासाठी, कोर्सचा कालावधी जास्तीत जास्त 4 आठवडे जो 29 तासांपर्यंत असेल. या ड्रायव्हिंग सेंटरचा अभ्यासक्रम 2 भागांमध्ये विभागला जाईल. थेरी आणि प्रॅक्टिकल.

4. लोकांना मूलभूत रस्ते, ग्रामीण रस्ते, महामार्ग, शहर रस्ते, रिवर्सिंग आणि पार्किंग, चढावर आणि डाउनहिल ड्राइविंग इत्यादींवर चालण्यास शिकण्यासाठी 21 तास घालवावे लागतील. थेरी भाग संपूर्ण अभ्यासक्रमाच्या 8 तासांत समाविष्टीत असेल. त्यात रोड शिष्टाचार समजून घेणे, रोड रेज, रहदारी शिक्षण, अपघातांची कारणे समजून घेणे, प्रथमोपचार आणि ड्राइविंग इंधन दक्षता समजावून घेणे आदींचा समावेश असेल.

 

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit