Mhlive24 टीम, 21 ऑक्टोबर 2020 :- केंद्र सरकारने इराणमधून नुकताच कांदा आयात केल्याने संपूर्ण देशासह राज्यात कांद्याचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहे.

मात्र, कांद्याचे भाव वाढले म्हणून सर्वसामान्य माणसाने बोंबलू नये, असे वक्तव्य बच्चू कडू यांनी केले. अमरावती येथे बोलताना बच्चू कडू यांनी कांद्याच्या वाढत्या किंमतींवर भाष्य केलं.

कांद्याचे दर वाढले म्हणून बोंबलू नका जर परवडत नसेल तर लसूण आणि मुळा खा’ असं वक्तव्य बच्चू कडू यांनी केलं आहे. शिवाय, हा कांदा शेतकऱ्यांचा नसून, आयात केलेला कांदा आहे.

मग आयात केलेल्या कांद्याचा शेतकऱ्यांना कसा फायदा होईल असा प्रश्न देखील कडू यांनी उपस्थित केला.

दरम्यान, कांद्याचे भाव वाढत असल्याने सरकारने काही आठवड्यांपूर्वी कांदा निर्यातबंदी करण्याचा निर्णय घेतला होता. त्याविरुद्ध टीकाही झाली होती.

आता सण आणि उत्सवांचे दिवस सुरू झाल्याने कांद्यांची मागणी वाढत असते. त्या काळात महागाई होऊ नये म्हणून हा निर्णय घेतल्याचं म्हटलं जात होतं.

कांद्याची निर्यात थांबली तर भाव आटोक्यात येतील असा अंदाज होता. मात्र, ज्या प्रमाणात भाव कमी व्हायला पाहिजे त्या प्रमाणात ते नियंत्रणात येत नव्हते.

📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत …आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9284295683  हा आमचा नंबर

Mhlive24

Marathi News Updates of Sarkari Yojana, Money, Share Market, Business ideas, Agriculture, Lifestyle and Technology