Mhlive24 टीम, 18 ऑक्टोबर 2020 :- परतीच्या पावसामुळे झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यात मोठे नुकसान झाले आहे. सोमवारी राज्यातील नुकसानी बद्दल आढावा बैठक घेण्यात येणार आहे.

त्यानंतर केंद्र सरकारकडे निधीची मागणी केली जाईल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राला भरीव मदत करावीच लागेल. राज्याचे जीसीटीचे तब्बल ६० हजार कोटी रुपये येणे आहे. तो परतावा ही मिळावी अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केली आहे.

कोरोना महामारीमुळे राज्यात लॉकडाऊन जाहीर केला. त्यामुळे मोठ्याप्रमाणात राज्याच्या महसूलात घट झाली. गेली सहा महिने झाले कर्ज काढून राज्य चालवत आहे. अजून काही दिवस असेच काढायचे आहेत. कोरोना महामारीच्या काळात देशाचे प्रधानमंत्री व्ही सी व्दारे देशाचा आढावा घेत आहेत.

मग राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली तर बिघडले कुठे ? असा सवाल त्यांनी विरोधी पक्ष भाजपला विचारत अजित पवारांनी यांनी मुख्यमंत्र्यांची पाठराखण केलीय. जलयुक्त शिवारच्या कामावर कॅगने ताशेरे ओढले. कॅग ही केंद्र सरकारची एजेंसी आहे.

या कामाची चौकशी करण्यामागे कोणतेही आकसाचा विषय नाही. तर सिंचन घोटाळ्याचा विषय न्याय प्रविष्ट असल्याने त्यावर बोलण्यास पवारांनी नकार दिलाय. सध्या हवामान खात्याचे अंदाज खरे ठरतात अशी कोपरखळी त्यांनी मारली .

नुकसानीची पुर्ण माहिती घेतल्याशिवाय तात्काळ नुकसान भरपाई जाहीर करणे चुकीचे होईल. पुर्ण आढावा घेवून मदत जाहीर केली जाईल. कुंभार घाटावर भिंत कोसळून सहा जणांचा मृत्यू झाला. या घाटाचे काम दर्जाहिन असल्याचे सांगत त्यांनी प्रशासनावर ताशेरे ओढले.

या ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याच्या सूचना त्यांनी पुन्हा एकदा प्रशासनाला दिल्या. पंढरपूरात जवळपास एक हजार कोटींची विकासकामे झालेत. मात्र अत्यंत निकृष्ट दर्जाची कामं झाल्याने याची आढावा बैठक घेवून माहिती घेणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत …आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9284295683  हा आमचा नंबर

Mhlive24

Marathi News Updates of Sarkari Yojana, Money, Share Market, Business ideas, Agriculture, Lifestyle and Technology