प्रत्येकाच्या आयुष्यात करोडपती बनण्याची स्वप्ने उड्डाण घेत असतात. मात्र यासाठी कष्ट करणे अनिवार्य असते. वास्तविक करोडपती बनणे सोपे नाही आणि यासाठी कसलाही शॉर्टकट देखील नाही.

पण आज आम्ही तुम्हाला काही ट्रिक्स देणार आहोत ज्यातून तुम्ही करोडपती होण्याचे स्वप्न पाहू शकता. जर तुम्ही पद्धतशीरपणे पैसे गुंतवले तर तुम्ही नक्कीच करोडपती होऊ शकता.

जर तुम्ही रोज काही पैसे वाचवले आणि योग्य गुंतवणुकीच्या पर्यायात गुंतवणूक केली तर तुम्ही काही वर्षात करोडपती होऊ शकता.

येथे आम्ही अशा पद्धतशीर गुंतवणुकीबद्दल सांगत आहोत. अशा गुंतवणुकीचे उत्तम उदाहरण म्हणजे वॉरेन बफे यांनी वयाच्या अवघ्या 11 व्या वर्षी शेअर बाजारात गुंतवणूक करायला सुरुवात केली.

आता त्यांचा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या गणनेत समावेश झाला आहे. चला तर आपण गुंतवणूक कशी करावी हे जाणून घेऊया.

दिवसाला 30 रुपये वाचवून तुम्ही करोडपती होऊ शकता जर तुम्ही वयाच्या 20 व्या वर्षापासून रोज 30 रुपये वाचवले आणि वयाच्या 60 व्या वर्षापर्यंत गुंतवणूक केली तर तुम्ही करोडपती व्हाल. दररोज 30 रुपये वाचवून तुम्ही संपूर्ण महिन्यासाठी 900 रुपये जोडू शकाल.

आता हे 900 रुपये दरमहा SIP (सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन) मध्ये गुंतवावे लागतील, याचा अर्थ जर तुम्हीं 40 वर्षांसाठी दरमहा 900 रुपये गुंतवले आणि तुम्हाला सरासरी 12.5% परतावा मिळत असेल तर तुम्ही करोडपती व्हाल.

तुमचे वय जास्त असल्यास, तुम्हाला SIP मध्ये अधिक पैसे गुंतवावे लागतील, जेणेकरून मोठा निधी मिळू शकेल,

तुम्ही आरडीमध्येही गुंतवणूक करू शकता आरडीमध्ये दरमहा 5500 रुपये जमा करून, तुम्ही भरपूर निधी तयार करू शकता. जर तुम्हाला RD मध्ये 9 टक्के व्याज • मिळाले तर 30 वर्षात तुम्ही करोडपती व्हाल. तुम्ही जास्त पैसे जमा केल्यास तुम्ही त्वरीत मोठा निधी तयार करू शकाल. 25 वर्षात करोडपती होण्यासाठी दरमहा 9,000 रुपये गुंतवावे लागतात. 20 वर्षात बनवायचे असल्यास, एखाद्याला महिन्याला 15,000 रुपये गुंतवावे लागतील.

लाभांश पुनर्गुतवणूक योजना देखील एक चांगला पर्याय आहे जर तुमच्यासाठी 40 वर्षे खूप जास्त असतील, तर तुम्ही डिव्हिडंड रीइन्व्हेस्टमेंट प्लॅन (DRIP) मध्ये म्युच्युअल फंडात गुंतवणूक करू शकता. यामध्ये तुम्हाला 12 ते 15 टक्के रिटर्न मिळू शकतो.