Mhlive24 टीम, 21 ऑक्टोबर 2020 :- कोरोनाने सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. भारतात लाखो लोकांना कोरोनाने आपल्या कवेत घेतले आहे. महाराष्ट्रात कोरोनाची रुग्णसंख्या अधिक असली तरी इतर राज्यांतही कोरोनाचे प्रमाण लक्षणीय आहेच. गोव्यातही कोरोनाचे थैमान सुरूच आहे.

परंतु सध्या त्या ठिकाणी त्यावर नियंत्रण मिळवण्यात बऱ्यापैकी यश येताना दिसून येत आहे. परंतु मंगळवारी एका दोन महिन्याच्या मुलाचा मृत्यू कोरोनाने झाल्याची हृदयद्रावक घटना गोव्यात घडली. गोव्यातील कोरोनाने मृत्यू पावलेल्यांचा आकडा 555 वर गेला आहे.

आत्तापर्यंतच्या मृत्यू पावलेल्यांमध्ये हा सर्वात कमी वयाचा मृत्यू आहे. उपचारांची शर्थ करूनही वाचलं नाही लेकरू वाचू शकलं नाही त्यामुळे सगळ्या कुटुंबीयांनाच धक्का बसला आहे. बाळाला कोरोनाची काही लक्षणं दिसल्यानंतर त्याची चाचणी पॉझिटिव्ह आली होती.

त्यानंतर त्याच्यावर उपचार करण्यात आले. मात्र वयामुळे उपचारासाठीही मर्यादा पडत असल्याने ते बाळ कोरोनामुक्त होऊ शकले नाही. डॉक्टरांनी बाळाला वाचवण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली. मात्र अखेर मंगळवारी त्याचा मृत्यू झाला.

गोव्यात आतापर्यंत 40 हजार 800 नागरिकांना कोरोनाची लागण झाली असून त्यापैकी 91 टक्के रुग्ण बरे झाले आहेत. अलिकडच्या चार दिवसांमध्ये कोरोना लागण होण्याचा प्रमाणही झपाट्याने कमी होत आहे.

📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत …आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9284295683  हा आमचा नंबर

Mhlive24

Marathi News Updates of Sarkari Yojana, Money, Share Market, Business ideas, Agriculture, Lifestyle and Technology