MHLive24 टीम, 6 ऑगस्ट 2021 :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांसाठी एक मोठी खुशखबर आली आहे. बँक ऑफ महाराष्ट्रने सोने, गृहनिर्माण, कार आणि सुवर्ण कर्जावरील प्रक्रिया शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आता आधीच आर्थिक परिस्थितीशी झुंज देणाऱ्या नागरिकांसाठी ही एक आधार म्हणून सिद्ध होईल.

जेव्हा तुम्ही कर्ज घेता, तेव्हा त्या कर्जाशी संबंधित अनेक बाबी तुम्हाला आधी कराव्या लागतात. त्यामुळे मोठ्या खर्चाचा भुर्दंड सहन करावा लागतो. यात इतर गोष्टींबरोबरच व्याज, प्रक्रिया शुल्क, प्रशासकीय शुल्क, प्रीपेमेंट दंड यांचा समावेश असतो. मात्र काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या सणासुदीच्या काळात ग्राहकांना अधिक लाभ देण्यासाठी बँकेने प्रक्रिया शुल्क माफ केले आहे. ही ऑफर 30 सप्टेंबर 2021 पर्यंत लागू असेल.

बँकेने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गृहकर्ज 6.90 टक्के व्याज दराने घेता येईल. त्याचबरोबर वाहन कर्जाचो व्याजदर 7.30 टक्के निश्चित करण्यात आला आहे. तसेच सुवर्ण कर्ज योजनेतही बदल करण्यात आल्याचे बँकेने म्हटले आहे. 20 लाख रुपयांपर्यंतच्या सुवर्ण कर्जाचा व्याजदर 7.10 टक्के आहे. त्याचबरोबर 1 लाख रुपयांपर्यंतच्या सुवर्ण कर्जासाठी प्रक्रिया शुल्क शून्यावर आणण्यात आले आहे.

स्टेट बँकेकडूनही सूट :- देशातील सर्वात मोठी बँक SBI ने म्हटले आहे की 31 ऑगस्ट 2021 पर्यंत गृहकर्ज मंजूर करण्यासाठी कोणतीही प्रक्रिया शुल्क आकारणार नाही. सध्या, गृहकर्जावर बँक 0.40 टक्के प्रक्रिया शुल्क आकारते. बँकेने म्हटले आहे की त्याने ग्राहकांना ही सवलत ‘मान्सून धमाका ऑफर’ अंतर्गत मर्यादित काळासाठी दिली आहे.

बँकेने म्हटले आहे की जर गृहकर्ज त्याच्या YONO अॅपद्वारे लागू केले असेल तर व्याजदरात 5 बेसिस पॉइंट अर्थात 0.05 टक्के सूट दिली जाईल. याचा अधिकाधिक गृहकर्ज ग्राहकांना फायदा होईल. यासह, रिअल इस्टेट बाजाराची सेंटिमेंट देखील सुधारेल.

गृह कर्जाचे दर सध्या सर्वात कमी पातळीवर आहेत :- बँकेने म्हटले आहे की, घर खरेदी करण्याची ही चांगली वेळ असू शकते कारण त्याच्या गृहकर्जाचे दर 6.70 टक्क्यांपासून सुरू होत आहेत, जे खूप कमी आहे. यासोबतच, ‘मान्सून धमाका ऑफर’ अंतर्गत गृहकर्जाचे प्रक्रिया शुल्क देखील 31 ऑगस्ट 2021 पर्यंत आकारले जात नाही. यामुळे ग्राहकांना घरे खरेदी करण्यास प्रोत्साहन मिळेल. सध्या, गृह कर्जाचे दर त्यांच्या सर्वात कमी पातळीवर आहेत.

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup