Mhlive24 टीम, 22 ऑक्टोबर 2020 :-राज्यात कोरोनाचे प्रकरण दिवसेंदिवस घटत आहे. एकीकडे कोरोनाबाधितांची संख्या घटत आहे तर दुसरीकडे कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या वाढत असल्याने राज्यात समाधानकारक वातावरण आहे.

आज सलग तिसऱ्या दिवशी नवीन रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या दुपट्टीपेक्षा अधिक झाली आहे. काल तर एका दिवसात २३ हजारांच्या आसपास रुग्ण बरे होऊन घरी गेले होते.

आज १६ हजाराहून अधिकांना घरी सोडण्यात आले आहे, यामुळे राज्यात आतापर्यंत १४ लाख ३१ हजार ८५६ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी पाठवण्यात आल्याची नोंद करण्यात आल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

राज्यातील वाढत्या कोरोनामुक्तांमुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८८.१ % एवढे झाले आहे. राज्यात आज १९८ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. सध्या राज्यातील मृत्यूदर २.६४ % एवढा आहे.

📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत …आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9284295683  हा आमचा नंबर

Mhlive24

Marathi News Updates of Sarkari Yojana, Money, Share Market, Business ideas, Agriculture, Lifestyle and Technology