News for farmers
News for farmers

MHLive24 टीम, 04 एप्रिल 2022 :- News for Farmers : शेतातील वेगवेगळ्या कामांसाठी ट्रॅक्टरचा उपयोग केला जातो. ट्रॅक्टर शिवाय शेतातील कामे करणे सद्यस्थितीला शेतकऱ्याला फार अवघड होत आहे.त्यामुळे काही शेतकऱ्यांची ट्रॅक्टर खरेदी करण्याची इच्छा असते.

पण ट्रॅक्टर च्या किंमती जास्त असल्यामुळे शेतकऱ्यांना तो खरेदी करणे अनेकांना शक्य होत नाही.तर अशा गरजू शेतकऱ्यांसाठी SBI बँकेने शेतकऱ्यांच्या सोयीनुसार एक मोठी कर्ज सुविधा आणली आहे. ज्यामध्ये शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी कर्जासोबतच चांगले अनुदानही देण्यात येणार आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांना आता ट्रॅक्टर खरेदी करणे सोपे होणार असून SBI बँकेच्या ग्राहक शेतकऱ्यांना यामध्ये ट्रॅक्‍टर खरेदी करण्‍यासाठी एक स्‍कीम आहे, जी झटपट ट्रॅक्‍टर लोन, कृषी मुदतीचे कर्ज, 100% किंमत विमा आणि नोंदणी शुल्कासह कर्ज म्हणून या योजनेचा लाभ घेता येतो.

या योजनेत बँकेकडून शेतकऱ्यांना कर्जाची परतफेड करण्यासाठी सुमारे 48 ते 46 महिन्यांचा कालावधी दिला जातो.याशिवाय ट्रॅक्टरच्या किमतीच्या मार्जिन 24-40-50 टक्के रक्कम टीडीआरमध्ये शून्य दराने जमा करावी लागणार आहे.

ज्या शेतकऱ्याकडे सुमारे २ एकर जमीन असेल, तो बँकेच्या या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहे. त्यानंतर ओळखपत्र, पासपोर्ट, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, डीलरद्वारे ट्रॅक्टर कोटेशन, लागवडीचा पुरावा, 6 पोस्ट डेटेड चेक इ. गोष्टीची पूर्तता करावी लागणार आहे.

शेतकऱ्यांना याआधीच सरकारी अवजार खरेदी करण्यासाठी अनुदान देत आहे. त्यात आता शेतकऱ्यांना बँक आणि शासनाच्या माध्यमातून ट्रॅक्टर आणि अवजार खरेदी करण्यासाठी अनुदान व कर्ज देण्यात आल्यामुळे शेतकरी या योजनेचा लाभ होणार आहे.

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup