Mhlive24 टीम, 23 ऑक्टोबर 2020 :-रिझर्व्ह बॅंकेने लॉकडाऊनच्या काळात सहा महिने कर्जाचा हप्ता न देण्याची सवलत बॅंक ग्राहकांना दिली होती. या काळात दोन कोटी रुपयांपर्यंतच्या कर्जाच्या व्याजावरील व्याज माफ करण्याची तयारी केंद्र सरकारने दाखविली होती.

त्यानुसार आता कर्जावरील व्याजावर व्याज माफ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. येत्या 2 नोव्हेंबर रोजी सर्वेच्च न्यायालयात याप्रकरणी सुनावणी होणार आहे. त्यावेळी केंद्र सरकारकडून न्यायालयाला ही माहिती दिली जाणार आहे.

कोरोना संकटामध्ये कर्जाचे हप्ते भरण्याची मुदत पुढे ढकलण्याचा अधिकार कर्जदारांना दिला गेला होता. बँकांचे त्या काळातील व्याज भरण्याची तयारी सरकारने दर्शवली होती.

त्यानंतरही अनेक बँकांना व्याजावर व्याज आकारणे सुरूच ठेवले होते. त्याविरोधात सर्वेच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्या होत्या.

काय होणार माफ ? :- कर्जाचे हप्ते भरले न गेल्याने चक्रवाढ व्याज आणि साधारण व्याज यातील फरकाची रक्कम सरकार भरणार आहे. त्यासाठी साडेपाच ते सहा हजार कोटी रुपये भरावे लागणार आहेत. दोन कोटी रुपयांपर्यंतच्या कर्जावरील मासिक हप्ते त्याचप्रमाणे शिक्षण,

घर, वाहन खरेदीसह आठ प्रकारच्या कर्जांवरील चक्रवाढ व्याज माफ केले जाईल असे सरकारने न्यायालयाला सांगितले होते. त्याचप्रमाणे क्रेडिट कार्डाच्या थकबाकीवरील व्याजही घेतला जाणार नाही.

📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत …आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9284295683  हा आमचा नंबर

Mhlive24

Marathi News Updates of Sarkari Yojana, Money, Share Market, Business ideas, Agriculture, Lifestyle and Technology