MHLive24 टीम, 22 जानेवारी 2022 :- कोरोनाच्या संकटात सामान्य माणूस धगधगत असतानाच प्रचंड वाढलेली महागाई संकट बनून आली आहे. गॅस सिलिंडरच्या वाढलेल्या किंमती हे त्याचेच उदाहरण!(LPG Booking)

LPG गॅसच्या वाढलेल्या किंमती या ग्राहकांना आर्थिकरित्या पूर्णपणे कोलमडून टाकत आहेत. दरम्यान आपण आज याच गॅस सिलिंडरवर मिळणाऱ्या कॅशबॅकबद्दल जाणून घेणार आहोत.

आम्ही आज तुम्हाला एका विशिष्ट कॅशबॅक ऑफरबद्दल सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही गॅस सिलेंडर बुक करून तुमचे काही पैसे वाचवू शकाल. वास्तविक, आयसीआयसीआय बँकेद्वारे संचालित पॉकेट्स अॅपद्वारे एलपीजी सिलेंडर बुक करून तुम्ही काही पैसे वाचवाल.

याप्रमाणे बुकिंग केल्यास कॅशबॅक मिळेल

तुम्ही पॉकेट्स अॅपद्वारेही गॅस बुक केल्यास तुम्हाला 10 टक्के कॅशबॅक (जास्तीत जास्त 50 रुपये) मिळेल. पॉकेट्स अॅपद्वारे गॅस सिलिंडर बुक करून ग्राहक 10% पर्यंत सूट मिळवू शकतात. या अॅपद्वारे गॅस बुक करण्याव्यतिरिक्त, तुम्ही 200 रुपयांपेक्षा जास्त बिल पेमेंटवर कॅशबॅक देखील घेऊ शकता. या अॅपद्वारे सिलिंडर बुक करणे खूप सोपे आहे.

तुमचा सिलिंडर अशा प्रकारे बुक करा

सर्वप्रथम तुमच्या मोबाईलवर Pockets Wallet अॅप डाउनलोड करा. हे अॅप तुम्ही गुगल प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. डाउनलोड केल्यानंतर, अॅप उघडा आणि रिचार्ज आणि पे बिल विभागात पे बिल्सवर क्लिक करा. त्यानंतर Choose Billers मधील More या पर्यायावर क्लिक करा.

येथे तुम्हाला LPG बुकिंगचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक केल्यावर, तुम्ही गॉल सिलिंडरच्या बुकिंगशी लिंक असलेला तुमचा मोबाइल नंबर टाका. मग येथून बिल भरा. एकदा बिल भरल्यानंतर तुम्हाला रिवॉर्ड्सच्या स्वरूपात कॅशबॅक परत मिळेल.

 

  • 😊 Mhlive24 आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा 👉🏻 https://t.me/mhlive24news
  • 🤷🏻‍♂️ फेसबुक वर बातम्या मिळविण्यासाठी Join करा आमचा फेसबुक न्यूज ग्रुप  http://bit.ly/mhlivefbgroup