Mhlive24 टीम, 20 ऑक्टोबर 2020 :-  भाजपाच्या महिल्या नेत्याचा आक्षेपार्ह शब्दात उल्लेख केल्यानंतर वार निर्माण झाल्याने मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी माफी मागितली आहे.

कमलनाथ यांनी भाजपच्या नेत्या व मध्य प्रदेशच्या मंत्री इमरती देवी यांना उद्देशून ‘आयटम’ हा शब्द वापरल्यामुळे वाद निर्माण झाला होता.

याप्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाने काँग्रेसचे नेते व राज्याचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्याकडे सोमवारी स्पष्टीकरण मागितलं.

आयोगाने हे प्रकरण आवश्यक त्या कारवाईसाठी निवडणूक आयोगाकडेही पाठवलं आहे. कमलनाथ म्हणाले, ‘जर आपलं वक्तव्य कोणाला आक्षेपार्ह वाटलं असेल तर आपण माफी मागतो, जर कोणालाही माझं वक्तव्य अनादर करणारं वाटलं असेल, तर मी दिलगिरी व्यक्त करतो.

नाव आठवलं नाही म्हणून ‘आयटम’ बोललो- कमलनाथ लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या यादीवर आइटम नंबर 1 , आइटम नंबर 2 असे उल्लेख असतात.

त्यामुळे मी आयटम हा शब्द वाईट हेतूने किंवा अपमान करण्याच्या हेतूने वापरला नव्हता. या शब्दात काहीही वावगे नाही.

सभेतील भाषणावेळी मला आमदार इमरती देवी यांचे नाव आठवत नव्हते. त्यामुळे मी त्यांचा उल्लेख ‘येथील जो आयटम आहे’, असा केल्याचं स्पष्टीकरण कमलनाथ यांनी दिलं होतं.

📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत …आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9284295683  हा आमचा नंबर

Mhlive24

Marathi News Updates of Sarkari Yojana, Money, Share Market, Business ideas, Agriculture, Lifestyle and Technology