file photo

Mhlive24 टीम, 22 ऑक्टोबर 2020 :-विश्रांतवाडी पोलीस स्टेशनमध्ये सुनील नायर या माथेफिरू विरुद्ध अट्रोसिटीचा गुन्हा दाखल करा. या मागणीसाठी आर.पी. आय, भीम लष्कर या कार्यकर्त्यांनी मागणी केली आहे.

सुनील नायर या माथेफिरु ने आपल्या सोशल माध्यमातून बाळासाहेब आंबेडकर यांचा आक्षेपार्ह उल्लेख केला.

त्या संदर्भात आज फिर्यादी प्रशांत सुनील डोळस यांनी एफ.आर.आय लिहून आरोपीवर अट्रोसिटी गुन्हा दाखल करावा ही मागणी केली.

यावेळी आर.पी.आय आठवले गट, भीम लष्कर, भीम बटालियन अशा अनेक संघटनाकडून विश्रांतवाडी पोलीस स्टेशन परिसरात घोषणा बाजी करण्यात आली.

📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत …आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9284295683  हा आमचा नंबर

Mhlive24

Marathi News Updates of Sarkari Yojana, Money, Share Market, Business ideas, Agriculture, Lifestyle and Technology