MHLive24 टीम, 8 सप्टेंबर 2021 :- येणारे युग आता इलेक्ट्रिक वाहनांचे आहे. जगातील सर्व मोठ्या कंपन्या आणि छोट्या स्टार्टअप देखील इलेक्ट्रिक वाहनांवर लक्ष केंद्रित करत आहेत. या भागात बीएमडब्ल्यू मोटरराडने म्युनिकमधील इंटरनॅशनल मोटर शो (IAA) मध्ये नवीन इलेक्ट्रिक वाहन सादर केले आहे. ( BMW E Cycle )

BMW Motorrad च्या नव्या कॉन्सेप्ट इलेक्ट्रीक सायकलवरून पडदा हटविला आहे. ही नाही सायकल आहे ना ही बायसिकल, या दोघांचा सुवर्णमध्य साधलेला कॉन्सेप्ट आहे. कंपनीचा दावा आहे की, ही सायकल सिंगल चार्जमध्ये 300 किमीची रेंज देते.

सिंगल चार्ज मध्ये 300 कि.मी :- कंपनीचा दावा आहे की हे सायकल एका चार्जमध्ये 300 किमी प्रवास करू शकते, जो अत्यंत धक्कादायक दावा आहे. हे इलेक्ट्रिक सायकल 60 किमी प्रतितासाचा टॉप स्पीड देखील पकडू शकते.

आरसी आणि ड्रायव्हिंग लायसन्स आवश्यक :- बीएमडब्ल्यू व्हिजन अॅम्बी हा हाय-स्पीड सायकल असल्याने, त्याला चालवण्यासाठी नोंदणी क्रमांक आणि ड्रायव्हिंग लायसन्सची आवश्यकता असेल. या सायकलमध्ये मोटर आणि बॅटरी पॅक आहे. जे सायकलच्या चौकटीत चांगले बसवण्यात आले आहे. हे एक एक कॉन्सेप्ट प्रोडक्ट असल्याने, त्याच्या उत्पादन आणि विक्रीसंदर्भात अचूक वेळ देण्यात आलेली नाही.

इतर वैशिष्ट्ये :- BMW Vision Amby मध्ये फक्त वेगाचीच चर्चा नाहीय तर ती जी रेंज देते ती अफलातून आहे. कारण ही रेंज अद्याप कोणतीही ईलेक्ट्रीक स्कूटरही देत नाहीय. ही इलेक्ट्रीक सायकल हाय स्पीड आहे, त्यामुळे तिचे रजिस्ट्रेशन करावे लागणार आहे. BMW Vision Amby एक हाय स्पीड इलेक्ट्रीक सायकल आहे. यामुळे रजिस्ट्रेशनच नाही तर तिला हेल्मेट घालून चालवावे लागणार आहे.

यासाठी ड्रायव्हिंग लायसनची देखील गरज लागणार आहे. जर लोक ही सायकल वेगाने चालवत असतील तर लायसन लागणार आहे. तसेच पॅडलऐवजी फुटरेस्ट असणार आहे. BMW Vision Amby मध्ये पुढील चाक26 इंचाचे असेल, तर मागील चाक 26 इंचाचे असेल. पुढील टायर बारीक असेल तर मागील चाकाला फुगीर टायर दिला जाईल. याचे वजन 65 किलो असून उंची 830mm आहे.

 

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit