Farmer Scheme: भारत हा एक शेतीप्रधान देश (Agriculture Country) आहे. अशा परिस्थितीत देशातील शेतकऱ्यांच्या (Farmer) कल्याणासाठी मायबाप सरकार कायमच कल्याणकारी योजना (Government Scheme) आणत असते. केंद्र सरकार तसेच देशातील विविध राज्यातील राज्य सरकारने आपल्या राज्यातील शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी वेगवेगळ्या शेतकरी हिताच्या योजना कार्यान्वित करत असतात.

आपल्या महाराष्ट्र शासनाने (Maharashtra Government) देखील महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी अशीच एक कल्याणकारी योजना आणली आहे. मित्रांनो जसं की आपणास ठाऊकच आहे शेती (Farming) करताना शेतकरी बांधवांना नानाविध अडचणींचा सामना करावा लागतो.

अनेकदा शेती करताना शेतकरी बांधवांना अपघाताला देखील सामोरे जावे लागते. यामध्ये वीज पडून शेतकऱ्यांचा अपघात होणे, पुरामुळे होणारे अपघात, विंचू किंवा सर्पदंशाने होणारे अपघात, विजेचा शॉक लागून होणारे अपघात, वाहन अपघात इत्यादी अपघातांचा समावेश आहे.

या अपघातामुळे शेतकरी बांधवांची अनेकदा जीवित हानी होत असते, शिवाय अनेकदा अपंगत्व देखील येत असते. अशा परिस्थितीत आता मायबाप शासनाने शेतकर्‍यांच्या हितासाठी एक योजना आणली आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा अपघात झाल्यास त्यांना दोन लाख रुपयांची मदत केली जाणार आहे. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना (Gopinath Munde Farmer Accident Insurance Scheme) असे या योजनेचे नाव असून या योजनेच्या माध्यमातून अपघातामुळे शेतकरी बांधवांना अपंगत्व आल्यास किंवा मृत्यू झाल्यास मदत दिली जाणार आहे.

यामुळे निश्चितच शेतकरी बांधवांच्या कुटुंबांना एक मोठा दिलासा मिळणार आहे. खरं पाहता शेतकरी कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचे अपघातात निधन झाल्यास किंवा अपंगत्व आल्यास त्या कुटुंबाचे उदरनिर्वाह धोक्यात येते. अशा प्रसंगी अपघात झालेल्या कुटुंबाला आर्थिक सहाय्य देऊन मायबाप शासनाकडून मोठा दिलासा दिला जात आहे. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना ही शेतकऱ्यांचा अपघात झाल्यास त्यांच्यासाठी मोठी फायद्याची ठरत असल्याचे सांगितले जात आहे.

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना नेमकी आहे तरी काय

मित्रांनो, अपघातात एखाद्या शेतकरी बांधवांचे डोळे किंवा दोन अवयव गेले तर दोन लाख रुपये देण्याचे प्रावधान या योजने अंतर्गत करण्यात आले आहे.

या योजनेच्या माध्यमातून जर एखाद्या शेतकरी बांधवांचे अपघातात एक अवयव निकामी झाले तर एक लाख रुपये म्हणजे जर शेतीच काम करताना काही अपघात झाला किंवा अपघातामुळे एक डोळा व एक अवयव निकामी झाल्यास नुकसानभरपाई एक लाख रुपये देण्यात येईल.

एवढेच नाही तर एखाद्या शेतकरी बांधवाचा अपघाती मृत्यू झाला तर दोन लाख रुपय अशा शेतकरी बांधवांच्या कुटुंबीयांना मिळणार आहेत.

या योजनेअंतर्गत मदतीसाठी अर्ज कोठे करायचा बरं?

जर एखाद्या शेतकऱ्याचा अपघात झाला असेल तर अशा शेतकरी बांधवाला या योजनेंतर्गत दावा करण्यासाठी त्याच्या वारसाला जवळच्या तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे अपघातानंतर 45 दिवसांच्या आत सामोरे जावे लागणार आहे. म्हणजेच अपघात झाल्यानंतर 45 दिवसाच्या आत सदर शेतकऱ्याला किंवा त्याच्या वारसदाराला दावा अर्ज सादर करावा लागणार आहे.

मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, दावा अर्जासोबत या योजनेसाठी आवश्यक योग्य ती कागदपत्रे देखील जोडावी लागणार आहेत. दावा अर्ज दाखल केल्यानंतर अधिकाऱ्याकडून दाव्याची तपासणी करून योग्य तो लाभ संबंधित शेतकरी बांधवाला या योजनेच्या माध्यमातून दिला जाईल.