Electric Vehicle : पेटोल डिझेलचे वाढते भाव आणि इलेक्ट्रिक वाहनांना आलेलं डिमांड पाहता अनेक ग्राहक इलेक्ट्रिक गाड्या खरेदी करण्याचा विचार करतं आहेत.

ग्राहकांचा कल लक्षात घेता कंपण्यानी देखील EV मध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आहे. अशातच एक कंपनी चर्चेचा विषय ठरत आहे.

ओला इलेक्ट्रिक लॉन्च झाल्यापासून अवध्या पाच महिन्यांत ओला इलेक्ट्रिकने इलेक्ट्रिक टू व्हीलर मार्केटमध्ये आपले वर्चस्व प्रस्थापितकेले आहे.

गेल्या महिन्यात म्हणजेच एप्रिलमध्ये हीरो इलेक्ट्रिकला मागे टाकून कंपनी पा सेगमेंटची लीडर बनली आहे. सरकारच्या वाहन पोर्टलनुसार, ओला इलेक्ट्रिकने एप्रीलमध्ये 12.683 वाहने ग्राहकांना दिली.

मार्चच्या तुलनेत ही कित्येक पटीनी जास्त आहे. दुसरीकडे, हिरो इलेक्ट्रिक, गेल्या महिन्यात 50 टक्क्यांनी घसरून फक्त 6,570 यूनिट्सवर आली.

कंपनीने केवळ इतकंच नाही तर एमिलमध्ये 10,000 पेक्षा जास्त दुचाकी विकणाऱ्या ओकिनावाला देखिल मागे टाकले आहे.

ओला इलेक्ट्रिक कधीही त्यांचे आकडे शेअर करत नाही, परंतु वाहन पोर्टलवरील डेटा असे दर्शवित आहे की नोव्हेंबरच्या मध्यात लॉन्च झाल्यापासून त्याची विक्री सातत्याने वाढत आहे.

एका अहवालानुसार ओला पारंपारिक डीलर्सपासून दूर गेली आणि क्लिष्ट RTO प्रक्रियेनंतर थेट ह डिलिव्हरी मॉडेल स्वीकारले. यासोबतच दर महिन्याला कंपनीच्या विक्रीतही वाढ होत होती.

हिरोमध्ये सेमीकंडक्टर चिपची कमतरता आहे दुसरीकडे, हिरो इलेक्ट्रिकनेही अलीकडच्या काही महिन्यात चांगली वाढ नोंदवली आणि मार्चमध्ये 13,000 हून अधिक वाहने वितरित केली.

तथापि, सेमीकंडक्टर चिप्सच्या कमतरतेमुळे ते आपल्या डीलरशिपला एक स्कूटर वितरित करू शकले नाही हे शनिवारी कबूल केले. कंपनीने सूचित केले आहे की मे महिन्यात त्याच्या डिलिव्हरीमध्ये व्यत्यय येईल, ज्यामुळे ओलाला फायदा होण्याची शक्यता आहे.

ola इलेक्ट्रिक वाहन किंमत Ola Electric ने Ola S1 आणि Ola S1 Pro स्कूटरची किंमत 85 हजार ने 1.10 लाख रुपये ठेवली आहे.

Ola S1 ची किंमत महाराष्ट्रात 94999 रुपये, राजस्थांमध्ये 89268 रुपये आणि गुजरातमध्ये 79999 रुपये आहे. Ola S1 Pro पी महाराष्ट्रात किंमत 1,24,999 रुपये गुजरातमध्ये 1,09,999 रुपये आणि राजस्थानमध्ये 1, 19,138 रुपये आहे.