पेटोल डिझेलचे वाढते भाव आणि इलेक्ट्रिक वाहनांना आलेलं डिमांड पाहता अनेक ग्राहक इलेक्ट्रिक गाड्या खरेदी करण्याचा विचार करतं आहेत.

ग्राहकांचा कल लक्षात घेता कंपण्यानी देखील EV मध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आहे. Tata Motors, Mahindra, MG Motors, Hyundai सारख्या प्रमुख कार कंपन्यांनी या विभागात त्यांची उत्पादने लाँच केली आहेत.

अशातच LML इलेक्ट्रिकने जर्मन इलेक्ट्रिक हायपरबाइक निर्मात्या eROCKIT AG सोबत संयुक्त उपक्रम तयार करण्यासाठी करारावर स्वाक्षरी केली आहे.

कंपनीच्या बाजूने ही घोषणा भारतात परतण्याच्या योजनेबाबत निर्णय घेतल्यानंतर काही दिवसांनी आली आहे.

हायपरबाइकचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होईल – भारतीय बाजारपेठेसाठी मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक हायपरबाईक तयार करणे हा या संयुक्त उपक्रमाचा उद्देश आहे.

1980 ते 2000 च्या सुरुवातीपर्यंत, LML स्कूटर भारतीय बाजारपेठेत खूप लोकप्रिय होत्या. कंपनीने स्कूटर, मोपेड आणि अगदी मोटारसायकलही बनवली. आता कंपनी नवीन उत्पादन विभाग, इलेक्ट्रिक स्कूटरसह पुनरागमन करण्याचा विचार करत आहे.

हायपरबाइक म्हणजे काय? eROCKIT ही पेडलवर चालणारी इलेक्ट्रिक मोटरसायकल आहे, ज्याला हायपरबाईक असेही म्हणतात, जी पेडलिंगसह सहजतेने फिरते. याचा टॉप स्पीड 90 किमी/ता पेक्षा जास्त आहे, जो प्रगत बॅटरी आणि इलेक्ट्रिक डायरेक्ट ड्राइव्ह मोटरसह येतो.