पेट्रोल डिझेलचे वाढते भाव आणि इलेक्ट्रिक वाहनांना आलेलं डिमांड पाहता अनेक ग्राहक इलेक्ट्रिक गाड्या खरेदी करण्याचा विचार करतं आहेत.

ग्राहकांचा कल लक्षात घेता कंपण्यानी देखील EV मध्ये गुंतवणुक करण्यास सुरुवात केली आहे. Tata Motors, Mahindra, MG Motors आणि Hyundai सारख्या प्रमुख कार कंपन्यांनी या विभागात त्यांची उत्पादने लाँच केली आहेत.

दरम्यान जर तुम्ही इलेक्ट्रिक टू स्कूटर घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक महत्वाची बातमी आहे. वास्तविक भारतात इलेक्ट्रिक स्कूटरची बाजारपेठ सतत वाढत आहे यात शंका नाही. नवीन कंपन्या आणि मॉडेल्सच्या आगमनाने बाजारपेठ वेगाने वाढत आहे.

मार्च 2022 मध्ये, इलेक्ट्रिक स्कूटर मार्केटमध्ये गेल्या वर्षीच्या मार्चच्या तुलनेत 795% वाढ झाली आहे. मार्च 2021 मध्ये 1,622 युनिट्सच्या तुलनेत गेल्या महिन्यात ई-स्कूटरची एकूण विक्री 14,523 युनिट्स होती.

चला जाणून घेऊया कोणत्या कंपन्यांनी सर्वाधिक इलेक्ट्रिक स्कूटर विकल्या आहेत. सेगमेंटमधील मार्केट लीडर बेंगळुरूस्थित ओला इलेक्ट्रिक आहे.

ओलाने मार्च 2022 मध्ये 9127 स्कूटर विकल्या आहेत. सध्या या विभागातील 62.85% मार्केट शेअर आहे. Ola ने देखील महिन्या-दर-महिन्याच्या तुलनेत 133.73% वाढ नोंदवली आहे. यात एथर एनर्जी दुसरी आहे. कंपनीने 2,591 मोटारींची विक्री केली. गेल्या वर्षी मार्चमध्ये एथरने 1,177 युनिट्सची विक्री केली होती.

अशा प्रकारे, कंपनीने वर्षभरात 120 टक्के वाढ नोंदवली आहे. त्यांचा बाजारातील हिस्सा 17.84% आहे. कंपनी Ather 450X इलेक्ट्रिक स्कूटर विकते, जी पूर्ण चार्ज केल्यावर 116 किमी पर्यंत चालते.

TVS iQube या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे, जी गेल्या वर्षीच्या तुलनेत 406 टक्क्यांनी वाढली आहे. गेल्या महिन्यात 1799 युनिट्सची विक्री झाली आहे. त्याचप्रमाणे बजाज चेतक स्कूटर चौथ्या स्थानावर आहे, ज्याने 1,006 युनिट्सची विक्री केली आहे.