Electric scooter : पेट्रोल डिझेलचे वाढते भाव आणि इलेक्ट्रिक वाहनांना आलेलं डिमांड पाहता अनेक ग्राहक इलेक्ट्रिक गाड्या खरेदी करण्याचा विचार करतं आहेत.

ग्राहकांचा कल लक्षात घेता कंपण्यानी देखील EV मध्ये गुंतवणुक करण्यास सुरुवात केली आहे. Tata Motors, Mahindra, MG Motors आणि Hyundai सारख्या प्रमुख कार कंपन्यांनी या विभागात त्यांची उत्पादने लाँच केली आहेत.

दरम्यान जर तुम्ही इलेक्ट्रिक स्कूटर घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक महत्वाची बातमी आहे. अशातच Komaki ने भारतात Komaki DT 3000 आणि Komaki Ey या दोन नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केल्या आहेत.

Komaki DT 3000 ची किंमत रु. 122,500 लाख (एक्स-शोरूम) मध्ये लॉन्च करण्यात आली आहे, तर Komaki LY ची किमत रु 88,000 लाख (एक्स-शोरून) आहे.

वैशिष्ट्ये :- डिस्क बैंक, मोबाइल चार्जिंग पॉइट, सेल्फ डायग्नोसिस इन्स्ट्रूमेंट, रिव्हर्स असिस्ट, रिमोट लॉक, टेलिस्कोपिक शॉकर, नॉइज फ्री फक्शनिंग, क्रूझ कंट्रोल आणि ब्लूटूथ स्पीकर ही काही खास वैशिष्ट्ये आहेत, जी नवीन फोगाकी ईव्हीमध्ये जोडण्यात आली आहेत.

बॅटरी श्रेणी :- Komaki DT 3000 मध्ये 3000V BEDC मोटर आणि पेटंट 62V52AH पेटंट अॅडव्हान्स लिथियम बॅटरी आहे. Komaki DT 3000 चा टॉप स्पीड 80 kmph आहे.

Komaki DT: पूर्ण चार्ज केल्यावर 220 किमी पर्यंतची रेंज देण्यास सक्षम आहे. यासोबतच कोमाकी LY पूर्ण चार्ज केल्यावर 80-90 किमी पर्यंतची रेंज देते. अशा पद्धतीने तुम्ही या इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करून चांगल्या प्रकारे त्यांचा लाभ घेऊ शकता.