Mhlive24 टीम, 19 ऑक्टोबर 2020 :-  अभिनेत्री शिल्पा शेट्टी हि तिच्या अभिनयाने आणि अदाकारीने नेहमीच प्रसिद्धीच्या झोतात असते. तिचे अनेक चाहतेही आहेत. तिला डोक्यावर घेणारे फॅन्सही आहेत.

तिची फॅशन आणि स्टाईल ही नेहमीच वेगळी असते. आता पुन्हा एकदा ती तिच्या फॅशनने ट्रोल झाली आहे. त्याचे झालेय असे की, शिल्पा शेट्टी साधारण १३ वर्षांच्या लांबलचक ब्रेकनंतर ‘हंगामा 2’ सिनेमातून पुन्हा रूपेरी पडद्यावर वापसी करत आहे.

या सिनेमाच्या शूटींगसाठी शिल्पा मनालीमध्ये होती. तेथून एका प्रायव्हेट जेटने ती मुंबईला परतली. यावेळी विमानतळावरचे तिचे फोटो व्हायरल झालेत. मात्र या फोटोंमधील शिल्पाचे फॅशनेबल कपडे आणि विशेषत: तिचे शूज पाहून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली.

ब्लॅक कलरची रिप्ड जीन्स आणि राऊउ नेकचा ओव्हरसाईज टॉप शिवाय वेगवेगळ्या पायात दोन वेगवेगळ्या रंगाचे शूज असा तिचा अवतार होता. तिची ही आगळीवेगळी फॅशन पाहून नेटकऱ्यांनी तिची खिल्ली उडवली.

शिल्पा तू उलटी जीन्स घातलीस का? एक शूज तुझा अन् एक शूज राजचा घातलास का? असे मजेदार प्रश्न नेटक-यांनी विचारले. इतकी काय घाई होती की, गडबडीत दोन वेगवेगळ्या रंगाचे शूज घातले? असा सवाल एका युजरने तिला केला.

📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत …आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9284295683  हा आमचा नंबर

Mhlive24

Marathi News Updates of Sarkari Yojana, Money, Share Market, Business ideas, Agriculture, Lifestyle and Technology