Mhlive24 टीम, 20 ऑक्टोबर 2020 :- केवळ ४१ तासांपूर्वी जन्मलेल्या बालिकेचा आईनेच गळा आवळला. उपचारादरम्यान या दुर्दैवी बालिकेचा मृत्यू झाला. सांगलीतील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला.

शनिवारी रात्री बालिकेचा गळा आवळल्याचा प्रकार लक्षात येताच तिच्यावर उपचार सुरू करण्यात आले होते. उपचारादरम्यान रविवारी रात्री तिचा मृत्यू झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार; सांगली येथील यलापूर येथे राहणाऱ्या सुमित्रा गंगाप्पा जुट्टी (३०) सिव्हिल रुग्णालयामध्ये दाखल झाली होती.

तिने एका गोंडस मुलीला जन्म दिला. मात्र, सुमित्राने ४१ तासांपूर्वीच मुलीचा गळा आवळला. दरम्यान, हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल असलेल्या एका महिलेने हा प्रकार पाहिला.

तिने याची माहिती वॉर्डमधील डॉक्टरांना दिली. त्यांनतर परिचारिकांनी उपचारासाठी बालिकेला ताब्यात घेतले. नवजात बालिकेच्या गळ्यावर हाताचे व्रण आढळले.

याबाबत सुमित्राला विचारणा केली असता, तिने उडवाउडवीची उत्तरे दिली. हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी तातडीने बालिकेवर उपचार सुरू केले. मात्र, उपचार सुरू असताना रविवारी रात्री बालिकेचा मृत्यू झाला.

📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत …आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9284295683  हा आमचा नंबर

Mhlive24

Marathi News Updates of Sarkari Yojana, Money, Share Market, Business ideas, Agriculture, Lifestyle and Technology