Mhlive24 टीम, 18 ऑक्टोबर 2020 :- राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या घटत आहे तर दुसरीकडे कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या वाढत आहे.

राज्यासाठी अत्यंत दिलासादायक बाब असून यामुळे काहीशी चिंता कमी झाली आहे. राज्यात आज 9060 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज 11204 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत.

आतापर्यंत एकूण 13 लाख 69 हजार 810 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात एकूण 1 लाख 82 हजार 973 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 85.86% झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात आज 150 जणांचा मृत्यू झाला आहे.

तसेच कोरोनाग्रस्त रुग्णांची एकूण संख्या 15 लाख 95 हजार 381 वर पोहोचली आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा तब्बल 42 हजारांवर पोहोचला आहे.

📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत …आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9284295683  हा आमचा नंबर

Mhlive24

Marathi News Updates of Sarkari Yojana, Money, Share Market, Business ideas, Agriculture, Lifestyle and Technology