Mhlive24 टीम, 20 ऑक्टोबर 2020 :-  राज्यातील कोरोनाची लाट ओसरताना दिसत आहे. गेल्या 24 तासांत राज्यात 8 हजार 151 कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे.

तर मागील चोवीस तासांमध्ये 07 हजा 429 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत कोरोना रुग्णांची संख्या 16 लाख 9 हजार 516 वर पोहचली आहे.

तर आत्तापर्यंत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 13 लाख 92 हजार 308 इतकी झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा 86.05 टक्के इतका झाला.

तर आज 213 कोरोनाग्रस्त रुग्णांनी प्राण गमावले आहेत. आतापर्यंत राज्यात 42 हजार 453 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.64 टक्के एवढा आहे.

📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत …आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9284295683  हा आमचा नंबर

Mhlive24

Marathi News Updates of Sarkari Yojana, Money, Share Market, Business ideas, Agriculture, Lifestyle and Technology