जर तुम्ही कायमच्या व्यवहारासाठी ATM वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वपूर्ण आहे. आज आपण ATM संबंधीत एक महत्वाची माहिती जाणून घेणार आहोत.

देशभरातील एटीएम कार्डवरून होणारी फसवणूक पाहता आता का ATM बाबत चाचपणी सुरु आहे. भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने सर्व ATM मधून कार्डलेस पैसे काढण्याची सुविधा प्रस्तावित केली आहे.

RBI गव्हर्नर शक्तीकांत दास यांच्या मते, “सर्व बँका आणि एटीएममधून कार्डलेस कॅश काढण्याची सुविधा प्रस्तावित आहे. UPI च्या माध्यमातून ग्राहक पैसे काढू शकतील.

कार्डलेस कॅश काढण्याची सुविधा काय आहे? या सुविधेत, एटीएममधून पैसे काढण्यासाठी ग्राहकाला त्याचे/तिचे डेबिट कार्ड वापरावे लागणार नाही. त्याऐवजी ग्राहकांना UPI वापरावे लागेल. Accenture In India मधील आर्थिक संघाचे नेतृत्व करणारी सोनाली कुलकर्णी म्हणते की याबाबत अद्याप कोणतीही स्पष्ट माहिती नाही. लवकरच हा UPI पर्याय ATM मध्ये दिसेल.

ही UPI प्रणाली कशी काम करेल?

पर्याय 1

ग्राहकांना विनंतीचे तपशील एटीएममध्ये भरावे लागतील.

त्यानंतर एटीएम क्यूआर कोड जनरेट करेल.

ग्राहक UPI अॅपद्वारे QR कोड स्कॅन करतील. त्यानंतर विनंती मंजूर केली जाईल.

आता एटीएममधून पैसे काढता येणार आहेत.

पर्याय 2 (टच स्क्रीन एटीएम)

ग्राहकाला एटीएममध्ये UPI आयडी आणि रक्कम लिहावी लागेल.

ही विनंती त्याच्या UPI फोन अॅपवर येईल.

पासवर्डद्वारे ते मंजूर करा.

ही प्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर तुम्ही रोख रक्कम काढू शकाल.