Business Success Story : व्यवसायात (Business) यश सहजासहजी मिळत नाही. व्यवसायात यश (Success Story) संपादन करण्यासाठी आणि व्यवसायातून करोडची कमाई करण्यासाठी रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र कराव्वी लागते.

व्यवसाय (Business Idea) असो किंवा कोणतेही अन्य क्षेत्र यशाची गिरीशिखरे सर करण्यासाठी कठोर मेहनत घ्यावी लागते. अनेकदा धोकाही पत्करावा लागतो, नुकसान देखील सहन करावे लागते. असच एक साजस उदाहरण समोर आल आहे ते राजस्थान मधून.

राजस्थान मधील फेमस पान्सारी ग्रुप (Successful Person) ज्यांची आजच्या घडीला करोडो रुपयांची उलाढाल आहे त्या ग्रुपची सुरवात अगदी छोट्या दुकानापासून झाली आहे. कदाचित यावर तुमचा विश्वास बसणार नाही मात्र छोटा किराणा दुकाना पासून सुरू केलेला व्यवसाय आजच्या घडीला तब्बल एक हजार कोटींहून अधिक उलाढाल करत आहे.

मित्रांनो पानसारी ग्रुपची सुरुवात राजस्थानमधील एका छोट्या किराणा दुकानातून झाली. पण आज ते एफएमसीजी सेगमेंटमध्ये मोठे नाव आणि विश्वासाचे प्रतीक बनले आहे. आज या समूहाची उलाढाल 1000 कोटींहून अधिक आहे. निश्चितच एका छोट्या दुकानापासून सुरू केलेला हा व्यवसाय यशाची गिरीशिखरे सर करत असल्याने चर्चा तर होणारच आहे. आज आपण देखील पानसारी ग्रुपच्या यशाचे बखान करणार आहोत. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया पानसरे ग्रुपचा सुरुवातीपासूनचा प्रवास.

अशी झाली बर सुरवात (Business Success Story) 

मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, पानसारी समूहाची सुरुवात 1940 च्या दशकात राजस्थानमधील पावता येथील एका छोट्याशा किराणा दुकानातून झाली आहे. 1940 च्या दशकात पानसारी इंडस्ट्रीजचे विद्यमान संचालक शम्मी अग्रवाल (Successful Businessmen) यांच्या आजोबांनी एका छोट्याशा दुकानाची पायाभरणी केली होती.

‘पानसारी की दुकान’ असं त्या दुकानाचं नाव होतं. या किराणा दुकानानंतर शम्मीचे आजोबा कोलकात्याला गेले. मग तिथे शम्मीच्या आजोबांनी मोहरी आणि तिळाचा घाऊक व्यवसाय सुरू केला. मात्र 80 च्या दशकाच्या पहिल्या वर्षांतचं शम्मीच्या आजोबांना या व्यवसायात (Business Story) जबरा लॉस झाला, हा व्यवसाय अयशस्वी झाला. खरे तर त्या वर्षी अतिवृष्टी झाली, त्यामुळे पिकांचे खूप नुकसान झाले. यामुळे अग्रवाल कुटुंब बियाणांचा व्यवसाय सोडून खाद्यतेलाच्या व्यवसायाकडे वळले.

राजधानी दिल्लीत नव्या पर्वाला झाली सुरुवात 

शम्मीच्या आजोबांच्या पश्चात शम्मीचे वडील राजधानी दिल्लीत आले. दिल्लीत आल्यानंतर शमीच्या वडिलांनी भाड्याने एक कारखाना घेतला. त्यात खाद्यतेलाचे उत्पादन सुरू केल्यानंतर त्यांनी 90 च्या दशकात व्यापारापासून उत्पादनापर्यंत सुरुवात केली.  2005 पर्यंत कंपनीने उत्तर भारतात 7 युनिट्स बसवल्या होत्या. त्यानंतर 2010 मध्ये शम्मी पानसारी ग्रुपमध्ये सामील झाला आणि त्याचे ब्रँडमध्ये रूपांतर करण्याचा विचार केला.

पानसारी ब्रँडेचे प्रसिद्ध मोहरीचे तेल

पानसारी ग्रुपला खरी चमक तेव्हा मिळाले जेव्हा शम्मीचे व्यवसायात (Business News) आगमन झाले. मित्रांनो शम्मीच्या आगमनानंतर पानसारी ग्रुपने पानसारी ब्रँडेड मोहरीचे तेल बाजारात आणले. जे की पानसरे ग्रुप साठी मोठे माइलस्टोन सिद्ध झाले. यातूनच पानसारी ग्रुपचे नसीब चमकले असेच म्हणावे लागेल. शम्मीने संपूर्ण समूहाचा व्यवसाय ते व्यवसाय असलेला मार्ग थेट व्यवसाय ते ग्राहक असा वळवला. आणि यामुळेचं समूहाला 2010-11 मध्ये 180 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले.  पण यशाला शॉर्टकट नसतो आणि यशाला अंत देखील नसतो.

असंच काहीसं शम्मी बाबत म्हणावे लागेल. कारण की 180 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाल्यानंतर देखील शम्मी यांना ही मर्यादा ओलांडायची होती. शम्मीला फॉर्च्युनसारख्या ब्रँडच्या यादीत सामील व्हायचं होतं. निश्चितच यशस्वी होण्यासाठी स्वप्नदेखील यशासारखीच चमकणारी असायला पाहिजेत आणि शम्मी यांचे स्वप्न तर अतिशय दैदिप्यमान होते. यामुळे पानसारी ग्रुपच्या शम्मीला निश्चितच चमकदार ताराच म्हणावं लागेल.

नुकसान देखील झाले बर 

शम्मीला केवळ यशाची गिरीशिखरेचं सर करायला मिळालीत असं नाही तर त्यांना अनेकदा व्यवसायात नुकसान ही सहन करावे लागले. अनेकदा असं झालं की, अनेकांनी वस्तू घेऊन पैसे दिले नाहीत. पण त्याच्या वडिलांनी त्याला नुकसानीची काळजी करू नका असे सांगितले होते. निश्चितच यशस्वी माणूस कधीच अपयशाला पाहून घाबरत नाही तर अपयश आल्यानंतर तो पुन्हा एकदा नवीन ऊर्जा घेऊन यशाच्या दिशेने घोडदौड सुरू करत असतो. शम्मीने देखील अपयशापुढे कधीच नतमस्तक केले नाही तर अपयशाला झुंजारून यशाकडे वाटचाल चालूच ठेवली.

शम्मी यांना त्यांच्या वडिलांसोबतच काकांची देखील साथ मिळाली. एक खास गोष्ट शम्मीने केली ती म्हणजे त्याने फक्त ब्रँडेड मोहरीच्या तेलावर लक्ष केंद्रित केले. यामुळे त्याला यश मिळाले. त्यानंतर 2016 पासून पानसारी ब्रँड नावाने आणखी उत्पादने सादर करण्यात आली. कंपनीने रिफाइंड व्हेजिटेबल ऑइल, तांदूळ, मैदा, मसाले, तृणधान्ये, इन्स्टंट इंडियन मिक्स इत्यादी उत्पादने सादर करण्यात व्यवस्थापित केले आहे. आता परिस्थिती अशी आहे की त्याची उत्पादने 57 हून अधिक देशांमध्ये निर्यात केली जात आहेत.

इतर व्यवसायात देखील प्रवेश केला बर (Business Success Story)

FMCG नंतर, पानसर ग्रुपने कालांतराने रिअल इस्टेट, सागौन प्लांटेशन आणि ऊर्जा यांसारख्या क्षेत्रात प्रवेश केला. YourStory च्या रिपोर्टनुसार, पानसारी ग्रुप पूर्ती ग्रुपच्या नावाने रिअल इस्टेटमध्ये व्यवसाय करतो. शम्मीने ऑस्ट्रेलियाच्या मोनाश युनिव्हर्सिटीमधून मार्केटिंग आणि फायनान्समध्ये एमबीए, दिल्ली विद्यापीठातून व्यवसाय प्रशासनात मास्टर्स आणि अनेक शॉर्ट कोर्स केले आहेत. 

आता तो लवकरच आरोग्य क्षेत्रातही उतरणार आहे. निश्चितच यशस्वी माणूस हा यश मिळाल्यानंतर थांबत नाही हे शम्मीने दाखवून दिले आहे. यशस्वी माणूस यश मिळाल्यानंतर यशाच्या अंतिम टोका पर्यंत जाण्याचा प्रयत्न करत असतो. शम्मी यांचा यशाच्या अंतिम टोकापर्यंत जाण्याचा प्रवास आजही मोठ्या थाटामाटात सुरूच आहे.