Business Success Story : कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करूनही अनेक वेळा लोक व्यवसायात (Business) फ्लॉप होतात, हे तुम्ही अनेकदा पाहिले आणि ऐकले असेल. त्याच वेळी, असे काही लोक आहेत जे खूप कमी रकमेसह व्यवसाय (Business Idea) सुरू करतात आणि व्यवसायात यशाची गिरीशिखरे सर करतात. अशा लोकांचे सर्वत्र कौतुक देखील केले जाते.

आज या लेखात आम्ही तुम्हाला अशाच एका महिलेची (Business Women) गोष्ट सांगणार आहोत जिने केवळ 3000 रुपयांपासून आपला व्यवसाय सुरू केला आणि आज ती तब्बल 130 कोटींच्या कंपनीची मालकीण (Successful Businessmen) आहे. या प्रवासात एक वेळ अशी आली की जेव्हा त्यांची कंपनी दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर होती पण त्यांनी हार मानली नाही.

तिने तिची मेहनत, समजूतदारपणा आणि पूर्ण समर्पणाने काम केले आणि कंपनीची पुनर्बांधणी करून इतिहास रचला. नीलम मोहन असे या महिला उद्योजकाचे (A woman entrepreneur) नाव आहे. चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया नीलम मोहन या महिला उद्यमीविषयी सविस्तर.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, बनारस हिंदू विद्यापीठातून बी.ए.  चे शिक्षण घेतलेल्या नीलम मोहनचे लग्न आयआयटी एमबीए प्रोफेशनल अमित मोहन यांच्याशी झाले होते, जेव्हा ती फक्त 21 वर्षांची होती. त्याच दरम्यान त्याचे कॉलेजचे तिसरे वर्ष चालू होते. यानंतर ती पतीसोबत दिल्लीला आली. 1977 मध्ये वयाच्या 22 व्या वर्षी नीलमने कामी फॅशन नावाच्या कंपनीत काम करायला सुरुवात केली.

1978 मध्ये, तिला तिच्या पहिल्या मुलाच्या गर्भधारणेमुळे दीर्घ रजा घ्यावी लागली. दिल्लीत राहून त्यांनी फ्रीलान्सर म्हणून पुरुषांचे कपडे डिझाइन करण्याचे काम सुरू केले. यानंतर त्यांनी यूपी एक्सपोर्ट कॉर्पोरेशनमध्येही काम केले. यादरम्यान नीलमला महिन्याला फक्त 3000 रुपये पगार मिळत असे. इतरांसाठी काम करत असताना नीलमने स्वतःसाठी काहीतरी केले पाहिजे याची जाणीव करून तिच्या कंपनीचा विचार केला.

यानंतर त्यांनी त्यांचा मित्र हरमिंदर सालधीसोबत काम करायला सुरवात केली. काही वर्षांनंतर, 1983 मध्ये नीलमने हरविंदर आणि दुसरा मित्र सुशील कुमार यांच्यासोबत ऑपेरा हाऊस नावाची खाजगी कंपनी सुरू केली. पहिल्या वर्षीच कंपनीची उलाढाल सुमारे 15,000,00 रुपये होती, जी पुढे जात राहिली.

पतीपासून वेगळे व्हावे लागले

यानंतर 1991 मध्ये काही वैयक्तिक कारणामुळे तिला पतीपासून वेगळे व्हावे लागले. कंपनीतील भागधारकांमध्येही मतभेद निर्माण झाले नीलमला कंपनी सोडावी लागली. यानंतर, 1993 मध्ये नीलमने चार टेलेरोसह तिची कंपनी सुरू केली आणि तिचे नाव मंगोलिया ब्लॉसम ठेवले. काही काळानंतर तिच्या कंपनीने एक घर विकत घेतले ज्याचे कारखान्यात रूपांतर झाले. ती आणि इतर कामगार कारखान्यात काम करायचे आणि तिथेच खाऊन झोपायचे.

जस की आपणा सर्वांना माहितीचं आहे की व्यवसायात चढ-उतार असतातच. निलमच्या बाबतीतही असेच घडले. 2002 मध्ये एक असा टप्पा आला जेव्हा कंपनी दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर पोहोचली. मात्र, या संकटातून बाहेर पडण्यासाठी त्याचे मित्र संकट मोचन बनून मदतीला आले.

इतकंच नाही तर अमेरिकेतून शिक्षण घेऊन परतलेला त्यांचा मुलगा सिद्धार्थने आईला मदत केली आणि आपल्या आईच्या पाठीशी उभा राहिला. हाती आलेल्या माहितीनुसार, सध्या त्यांच्या कंपनीचे नेटवर्क सुमारे 130 कोटींचे आहे. आता त्यांचा मुलगा सिद्धार्थ आणि सून पल्लवी मिळून ही कंपनी सांभाळायला मदत करत आहेत.