Business Success Story : कोणत्याही क्षेत्रात अहोरात्र कष्ट, कष्ट आणि कष्टच केले तर निश्चितच त्या क्षेत्रात माणूस बॉस बनतो. मग ते क्षेत्र कोणतेही असो. कोणत्याही क्षेत्रात यशाला (Success Story) गवसणी घालायची असेल तर योग्य नियोजन आणि नियोजनाच्या जोडीला कष्टाची सांगड घालावीच लागते.

आज आपण अशाच एका अवलिया विषयी जाणून घेणार आहोत ज्याने आपल्या कष्टाच्या आणि नियोजनाच्या जोरावर गरिबीतुन श्रीमंतीतिकडे मोठी लांब उडी घेतली आहे. त्यामुळे सध्या हा अवलिया चर्चेचा विषय देखील ठरत आहे.

मित्रांनो आज आपण एका अशा अवलिया उद्योगपतीविषयी (Businessmen) जाणून घेणारा आहोत जो एकेकाळी फळ विकायचा मात्र आजच्या घडीला त्याने तीनशे कोटीची कंपनी उभारली आहे. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून ठेवूया या अवलिया विषयी सविस्तर.

अपार मेहनतीच्या जोरावर उभारले कधीही न खचणार कोट्यवधींचे साम्राज्य

मित्रांनो आज आपण ज्या अवलियाच्या यशोगाथेविषयी जाणून घेणार आहोत आणि आत्तापर्यंत ज्याच्याविषयीं आपण बोलत आहोत त्याचे नाव आहे रघुनंदन श्रीनिवास कामत. मित्रांनो रघुनंदन श्रीनिवास कामत (Successful Businessmen) यांचा जन्म कर्नाटकात झाला. कामत यांचा जन्म अतिशय गरीब कुटुंबात झाला. गरीब कुटुंबात जन्माला आले असताना देखील त्यांच्या स्वप्नात एक वेगळीच ताकद होती ज्यामुळे ते आज गरिबीतून कोट्यावधींच्या साम्राज्यापर्यंत पोहोचले आहेत.

गरीब कुटुंबात जन्माला आलो म्हणून त्यांनी उच्च स्वप्न बघणे काही सोडले नाही आणि आज आपल्या मेहनत आणि समर्पणाच्या जोरावर त्यांनी कोट्यवधींचे साम्राज्य उभे केले आहे. मित्रांनो कामत यांचे वडील फळे आणि लाकूड विकून 7 मुलांचा उदरनिर्वाह जेमतेम भागवत असतं. कामत मोठे झाल्यावर कुटुंबाची जबाबदारी आणि त्यांचा उदरनिर्वाह भागवण्यासाठी कामानिमित्त भावांसोबत मुंबईला आले.

ढाब्यावरही काम केले

इथे गोकुळ नावाने ढाबा चालवणाऱ्या कामतच्या बंधूंनीही त्याला तिथे कामाला लावले. ढाब्यावर ग्राहकांना आईस्क्रीम खरेदी करताना पाहून कामत यांच्या मनात एक दिवस काहीतरी वेगळं करण्याचा विचार आला. हळूहळू तो आईस्क्रीमच्या व्यवसायाबाबत विचार करू लागला. दरम्यान 1983 मध्ये त्यांचे लग्न झाले आणि अखेर त्यांनी आईस्क्रीमचा व्यवसाय (Business) लग्नानंतर सुरू केला.

आइस्क्रीमला दिली नैसर्गिक टेस्ट (Business Success Story) 

कामत यांनी 14 फेब्रुवारी 1984 रोजी जुहू येथे नॅचरल्स आईस्क्रीम मुंबई नावाचे आउटलेट सुरू केले. त्याच्या आईस्क्रीमचे वैशिष्ट्य म्हणजे त्याची चव अगदी नैसर्गिक होती. पण त्याच्या आईस्क्रीम पार्लरमध्ये फारसे लोक येत नसत. यामुळे त्यांना खूप काळजी वाटू लागली आणि सतत व्यवसाय वाढवायचा विचार ते करू लागले.

मसालेदार पावभाजीसह आईस्क्रीम

त्यांनी सुरु केलेला हा व्यवसाय (Small Business Idea) अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि आपले आईस्क्रीम अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कामत यांनी आईस्क्रीमसोबत मसालेदार पावभाजी बनवण्याचे काम सुरू केले. आता पावभाजी खायला येणारे लोक मसालेदार आणि कामतचे थंड आणि गोड आईस्क्रीम देखील खाऊ लागले. त्यातून हळूहळू त्याच्या आईस्क्रीमला खरी ओळख मिळू लागली.

या फ्लेवर्सपासून झाली सुरुवात

सुरुवातीला कामत यांनी फळ, दूध आणि साखर घालून आंबा, चॉकलेट, कोथिंबीर, काजू आणि स्ट्रॉबेरीच्या चवीचे आइस्क्रीम बनवले. त्याच्या आईस्क्रीममध्ये कोणतीही भेसळ नव्हती, त्यामुळे हळूहळू लोकांचा त्याच्यावरचा विश्वास वाढत गेला. नंतर त्याने येथे पावभाजी विकणे बंद केले आणि नेचुरल आईस्क्रीम पार्लर सुरू ठेवले.

आज व्यवसायाने 300 कोटींचा टप्पा ओलांडला

कामत यांची कंपनी नॅचूरल आईस्क्रीमने आज संपूर्ण देशात ठसा उमटवला आहे. कंपनीच्या वेबसाइटनुसार, आज त्यांची देशभरात 135 आउटलेट आहेत. 5 फ्लेवर्सपासून सुरू झालेली ही आईस्क्रीम कंपनी आज 20 फ्लेवर्सची आईस्क्रीम लोकांसाठी घेऊन येत आहे. शिवाय कंपनीची उलाढाल देखील आता तीनशे कोटींच्या वर गेली आहे.