Mhlive24 टीम, 18 ऑक्टोबर 2020 :- केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते रविशंकर प्रसाद आज बिहारमध्ये एका हेलिकॉप्टर अपघातात बालंबाल बचावले.

बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचार अभियानादरम्यान, रविशंकर प्रसाद यांच्या हेलकॉप्टरच्या पंख्याची पाती तारेत अडकली.

त्यामुळे हेलिकॉप्टरची पाती तुटली. हा अपघात घडला तेव्हा रविशंकर प्रसाद यांच्यासोबत हेलिकॉप्टरमधून मंगल पांडेय आणि संझय झा हे प्रवास करत होते.

बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून पहिल्या टप्प्यासाठी प्रचाराला वेग आला आहे. भाजपने अनेक दिग्गज नेते प्रचाराच्या मैदानात उतरवले आहेत.

केंद्रित मंत्री रविशंकर प्रसाद देखील प्रचारासाठी बिहारमध्ये आहेत. रविशंकर प्रसाद हे बिहार विधानसभा निवडणुकीसाठीचे प्रचार अभियान आटोपून पाटणा येथे परतत असताना हा अपघात झाला.

पाटणा विमानतळावर हेलिकॉप्टर उतरत असताना रविशंकर प्रसाद यांच्या हेलिकॉप्टरच्या पंख्याची पाती बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी ओव्हरहेड वायरला अडकली.

दरम्यान, ही दुर्घटना घडण्यापूर्वी केंद्रीय मंत्री हेलिकॉप्टरमधून उतरले होते आणि ते सुरक्षित असल्याची माहिती देण्यात आली आहे.

📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत …आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9284295683  हा आमचा नंबर

Mhlive24

Marathi News Updates of Sarkari Yojana, Money, Share Market, Business ideas, Agriculture, Lifestyle and Technology