Mhlive24 टीम, 25 ऑक्टोबर 2020 :- सध्या कोरोनाने सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे अनेक महिन्यांपासून शाळा बंद आहेत. परंतु शाळा बंद असल्या तरी शिक्षक ऑनलाईन शिक्षण विद्यार्थ्यांना देत आहेत.

शाळा कधी सुरु करायच्या याबाबत निश्चित माहिती नाही. परंतु कोरोनाचा संसर्ग पाहता शाळांना शिक्षकांना हजेरीची सक्‍ती करु नये.

हजर न राहिल्यास वेतन कपात करु नये आणि ऑनलाइन शिक्षणाशिवाय कोणतीही परीक्षा आयोजित करु नये, असे आदेश विभागीय शिक्षण उपसंचालक अनिल साबळे यांनी काढले आहेत.

कोरोना काळात ऑनलाइन शिक्षण देत असतानाही शाळांच्या हट्टापायी शिक्षकांना नवी मुंबई, पालघर, ठाणे, रायगड अशा दूर ठिकाणाहून तीन ते चार हजारांचा खर्च करुन यावे लागत आहे.

दुसरीकडे लोकल ट्रेन बंद असल्याने त्यांना खासगी वाहन करुन शाळेत यावे लागत आहे. याबाबत शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे यांनी विभागीय शिक्षण उपसंचालकांना निवेदन दिले.

त्यानंतर विभागीय शिक्षण उपसंचालकांनी शाळांसाठी स्वतंत्र पत्र काढले. त्यानुसार त्यांनी शिक्षक तथा कर्मचाऱ्यांचा ऑलाइन कर्तव्यकाळ ग्रहित धरून कोणत्याही कर्मचाऱ्यांचे वेतन रोखू नये, असे आदेश दिले.

📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत …आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9284295683  हा आमचा नंबर

Mhlive24

Marathi News Updates of Sarkari Yojana, Money, Share Market, Business ideas, Agriculture, Lifestyle and Technology