Mhlive24 टीम, 25 ऑक्टोबर 2020 :-मागील काही महिन्यांमध्ये भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील घटक पक्ष भाजपाची साथ सोडत असल्याचे दिसत आहेत. शिवसेना, अकाली दल, गोरखा जनमुक्ती मोर्चानंतर आता आणखी एक पक्ष भाजपाला रामराम करणार आहे.

केरळ काँग्रेस (पी. सी. थॉमस गट) ने रविवारी एनडीएतून बाहेर पडणार असल्याचे जाहीर केले आहे. भाजपासाठी हा चौथा धक्का आहे. दिलेल्या आश्वासनानुसार आपल्या पक्षावला कोणतीही जागा देण्यात आली नसल्यामुळं एनडीएची साथ सोडण्यावाचून कोणताच पर्याय उरला नाही,

असं म्हणत रविवारी याबाबतची अधिकृत घोषणा करण्याची माहिती केरळ काँग्रेस नेते पी.सी. थॉमस यांनी दिली. केरळ काँग्रेस नेते चेन्निथला यांनी यूडीएफमध्ये आपलं स्वागत केल्याची बाबही त्यांनी स्पष्ट केली. त्यामुळं राजकीय वर्तुळात आता हे एक नवं वादळ आल्याचं म्हटलं जात आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच शिवसेनेने एनडीएशी नाते तोडले. त्यानंतर शिरोमणी अकाली दल एनडीएतून बाहेर पडलं होत.

प. बंगालमधील गोरखा जनमुक्ती मोर्चानंही एनडीएपासून वेगळं होण्याची घोषणा केली होती. आणि आता केरळ काँग्रेस (पी. सी. थॉमस गट) बाहेर पडल्याने एनडीएला चौथा धक्का बसला आहे.

📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत …आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9284295683  हा आमचा नंबरp

Mhlive24

Marathi News Updates of Sarkari Yojana, Money, Share Market, Business ideas, Agriculture, Lifestyle and Technology