MHLive24 टीम, 19 जून 2021 :- भारताचे माजी धावपटू मिल्खा सिंग यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. कोरोना विरुद्धची त्यांची झुंज अपयशी ठरली आहे.ते 91 वर्षांचे होते रुग्णालयात उपचारा दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली आहे. पंजाबमधील चंडीगड येथील रुग्णालयात शुक्रवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास त्यांचे निधन झाले. 

मिल्खा सिंग यांच्या कूक ला सर्वप्रथम कोरोनाचा संसर्ग झाला होता आणि त्यानंतर त्यांना आणि पत्नी निर्मल मिल्खा सिंग यांना कोरोनाचा संसर्ग झाला.

मोहालीतील एका रुग्णालयात मिल्खा सिंग यांना दाखल करण्यात आले होते. करोनाची चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना बुधवारी जनरल आयसीयूत ठेवण्यात आले.

त्यानंतर मिल्खा सिंग यांना अचानक ताप आला. शिवाय त्यांच्या ऑक्सिजन पातळीतही घसरण झाली. काही दिवसांपूर्वी मिल्खा यांच्या पत्नीचेही करोनामुळे निधन झाले होते.

पत्नीचे निधन झाले त्यावेळी आयसीयूमध्ये असल्यामुळे मिल्खा सिंह अंत्यविधीला अनुपस्थित होते. काही दिवसांतच त्यांचेही निधन झाले. यामुळे मिल्खा सिंह यांचा मुलगा प्रसिद्ध गोल्फपटू जीव मिल्खा सिंह आणि संपूर्ण कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

मिल्खा सिंग यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताकडे बघण्याची दृष्टी बदलली होती. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा असो किंवा कोणत्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा त्या काळात मिल्खा सिंग यांचा क्रीडा विश्वात चांगलाच दबदबा होता. मिल्खा सिंग यांनी त्या काळी जे यश मिळवले त्याची तुलना कोणत्याही गोष्टीशी होऊ शकत नाही.

मिल्खा सिंग यांची भारताचे महान धावपटू म्हणून ओळख आहे. त्यांनी आशियाई स्पर्धेत चार सुवर्ण पदक जिंकले होते. तसेच राष्ट्रकूल स्पर्धेतही विजेतेपद पटकावले.

आतापर्यंत बरीच सुवर्णपदके त्यांनी आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पटकावली होती आणि क्रीडा विश्वात भारताची दखल घेण्यासाठी जगाला भाग पाडले होते. १९५८ साली झालेली राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आणि त्यानंतर १९६० साली झाली झालेली रोमममधील ऑलिम्पिक स्पर्धा मिल्खा सिंग यांनी चांगलीच गाजवली होती.

मिल्खा सिंग यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्विट करून मिल्खा सिंग यांच्या निधनाबाबत दु:ख व्यक्त केले आहे. मोदी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की,

” आम्ही एक महान खेळाडू गमावला आहे. मिल्खा सिंग यांनी आपल्या देदिप्यमान कामगिरीच्या जोरावर आपली कल्पनाशक्ती बदलली होती. त्यांनी असंख्य भारतीयांच्या मनामध्ये आदराचे स्थान निर्माण केले होते. लाखो लोकांना त्यांनी प्रेरणा दिली होती. त्यांच्या निधनामुळे अतीव दु:ख झाले आहे.”

  • 👍🏻 राज्यातील ब्रेकिंग बातम्या आणि महत्वपूर्ण माहितीसाठी आजच लाईक करा आमचे FB पेज http://bit.ly/mhlivefbpage
  •  🤷🏻‍♀️ Mhlive24  आता ट्विटर वर ही आजच फॉलो करा http://bit.ly/mhlivetwit

Mhlive24

Marathi News Updates of Sarkari Yojana, Money, Share Market, Business ideas, Agriculture, Lifestyle and Technology