Mhlive24 टीम, 18 ऑक्टोबर 2020 :-  गेल्या तीन-चार दिवसांमध्ये राज्यातील अनेक भागांमध्ये प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पुणे विभागातही पावसाने कहर केला.

अतिवृष्टीमुळे पुणे विभागातील कोल्हापूर वगळता चार जिल्ह्यांमध्ये 29 नागरिकांचा मृत्यू झाला असून, आठ जण बेपत्ता आहेत.

या अतिवृष्टीमुळे पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्यामुळे आणि भिंत पडून पुणे जिल्ह्यात सात, सातारा दोन, सांगली सहा आणि सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक चौदा जणांचा मृत्यू झाला आहे.

वाड्या-वस्त्यांमध्ये पाणी शिरल्यामुळे 40 हजारांहून अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करण्यात आले आहे. तसेच, 87 हजार 416 हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.

पुण्यात 18 हजार 746 हेक्‍टर, सातारामध्ये एक हजार 420 हेक्‍टर , सांगलीमध्ये आठ हजार 276 हेक्‍टर, सोलापूरमध्ये 58 हजार 581 हेक्‍टर,

कोल्हापूरमध्ये 393 हेक्‍टर जमिनीवरील पिकांचे नुकसान झाले आहे. पुणे विभागातील सोलापूर, सांगली,

पुणे आणि सातारा जिल्ह्याला बुधवारी (ता. 14) झालेल्या अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे. सोलापूर जिल्ह्यातील उत्तर सोलापूर, मोहोळ, माढा, करमाळा,

माळशिरस तालुक्‍यांमध्ये शंभर मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला. पुणे जिल्ह्यातील पुणे शहरासह, हवेली, बारामती,

इंदापूर, दौंड आणि सासवड तसेच सांगली जिल्ह्यात मिरज, वाळवा, तासगांव आणि पलूस तालुक्‍यांमध्ये शंभर मिमीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे.

📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत …आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9284295683  हा आमचा नंबर

Mhlive24

Marathi News Updates of Sarkari Yojana, Money, Share Market, Business ideas, Agriculture, Lifestyle and Technology