Mhlive24 टीम, 21 ऑक्टोबर 2020 :- सध्या पावसाने सर्वांच्याच तोंडचे पाणी पळवले आहे. जूनच्या पूर्वार्धात सुरु झालेला पाऊस अद्यापही सुरूच आहे.

मध्यंतरी थंडावलेला पाऊस सुखावणारा असला तरी पुन्हा वादळाने मागील दोन दिवसात महाराष्ट्रात पुन्हा पावसाने थैमान घातले.

आता महाराष्ट्रावर घोंगावणारे अतितीव्र कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता गुरुवारी कमी झाली असली तरी हवामान खात्याने पाऊस पुन्हा एकदा बरसणार असल्याचा

अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकण या भागात पावसाच्या मध्यम ते हलक्या आणि काही भागात जोरदार सरी कोसळणार असल्याचं

हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे. पुढील चार ते पाच दिवसांसाठी पर्जन्यमानाचा हा अंदाज वर्तवण्यात आला असून,

२१ आणि २२ ऑक्टोबरला विशेष काळजी घेण्याचा इशाराही देण्यात आला आहे. कुलाबा वेधशाळेचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी ट्विट करतही यासंदर्भातील माहिती दिली.

📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत …आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9284295683  हा आमचा नंबर

Mhlive24

Marathi News Updates of Sarkari Yojana, Money, Share Market, Business ideas, Agriculture, Lifestyle and Technology