आधार कार्ड हे जवळपास सर्वच सरकारी तसेच महत्वाच्या खाजगी व्यवहारांसाठी आता आवश्यक झाले आहे. कोणतीही सरकारी योजना असो त्यासाठी आपल्याला आधार कार्डची गरज भासते.

अनेक सेवांसाठी ते आपल्याला आवश्यक आहे. बँकेत खाते उघडण्यापासून ते आपले डीमॅट खाते बनवण्यापर्यंत आपल्याजवळ आधार कार्ड असणे आवश्यक आहे.

अशातच युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) चे राष्ट्रीय रिमोट सेन्सिंग सेंटर (NRSC) यांनी तांत्रिक सहकार्यासाठी करार केला आहे.

करारानुसार, NRSC ‘भुवन-आधार’ पोर्टल विकसित करेल जे देशभरातील आधार कार्ड केंद्रांचे स्थान प्रदान करेल. याशिवाय, पोर्टल रहिवाशांच्या गरजांवर आधारित संबंधित आधार केंद्रांच्या गंतव्यस्थानाची किंवा स्थानाची माहिती देखील प्रदान करेल.

UIDAI, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय आणि NRSC यांच्यात तांत्रिक सहकार्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे, असे अधिकृत निवेदनात म्हटले आहे.

फसवणुकीत अडकू नका या करारावर UIDAI उपमहासंचालक शैलेंद्र सिंह आणि NRSC संचालक प्रकाश चौहान यांनी स्वाक्षरी केली. UIDAI चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह NRSC चे इतर वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.