Mhlive24 टीम, 18 ऑक्टोबर 2020 :-  काल नवरात्रीचा पहिला दिवस कल्याणमधील वैष्णवी रूग्णालयासाठी काहीसा खास आणि दुर्मिळ असाच ठरला.

या रुग्णालयात काल एकाच दिवशी तब्बल 9 मुलींचा जन्म झाल्याची अनोखी घटना घडली आहे. रुग्णालयात थोड्या थोडक्या नव्हे तर तब्बल 11 महिलांची प्रसूती करण्यात आली.

ज्यामध्ये 11 पैकी 9 महिलांनी मुलींना जन्म दिला. नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी घडलेल्या या दुर्मिळ योगायोगाची वैद्यकीय क्षेत्रासह सगळीकडेच चर्चा होत आहे.

📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत …आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9284295683  हा आमचा नंबर

Mhlive24

Marathi News Updates of Sarkari Yojana, Money, Share Market, Business ideas, Agriculture, Lifestyle and Technology