7th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी (Government Employee) एक कामाची बातमी समोर येत आहे. मीडिया रिपोर्टमध्ये केलेल्या दाव्यानुसार कर्मचाऱ्यांना लवकरच नवीन वेतन आयोग (8th Pay Commission) लागू होणार आहे. आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की, कर्मचाऱ्यांना (Government Employee) आठ ते दहा वर्षांच्या कालावधीत नवीन वेतन आयोग लागू केला जातो.

अशा परिस्थितीत सातवा वेतन आयोग लागू होऊन एवढा कालावधी उलटला असल्याने लवकरच सरकारी कर्मचाऱ्यांना (State Government Employee) नवीन वेतन आयोग लागू केला जाईल अशी माहिती समोर येत आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना (Employee) पहिला वेतन आयोग 1946 साली लागू करण्यात आला होता. सातवा वेतन आयोग 2014 साली लागू झाला आहे. अशा परिस्थितीत सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन वेतन आयोग लागू केला जाईल अशी चर्चा सध्या जोर धरू लागली आहे.

सरकारी कर्मचारी आता आठ वा वेतन आयोग लागू होण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान सरकारी कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग ऐवजी सातवा वेतन आयोगात सुधारणा केली जाऊ शकते असे देखील काही तज्ञ नमूद करत आहे. याबाबत केंद्रीय राज्यमंत्री चौधरी यांनी देखील आपले मत व्यक्त केले आहे. मंत्रीमहोदयांच्या मते सध्या सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाअंतर्गत वेतन आणि भत्ते यांचा लाभ दिला जात आहे.

यामुळे नवीन वेतन आयोग लागू करण्याची कोणतीच गरज नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. म्हणजेच सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन आयोग लागू करून पेन्शन तसेच वेतन आणि भत्ते देऊ करण्याऐवजी सध्याच्या सातवा वेतन आयोग यामध्ये सुधारणा केली जाऊ शकते अशी शक्यता देखील यावेळी वर्तवली जात आहे. सातवा वेतन आयोगात बदल म्हणून महागाई भत्ता वाढ कर्मचाऱ्यांना लागू केली जाऊ शकते. यामुळे कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोगाप्रमाणेच लाभ मिळणार असल्याचे जाणकारांनी सांगितले आहे.

सरकारी कर्मचाऱ्यांना 2023-24 मध्ये नवीन वेतन आयोग लागू केली जाण्याची शक्यता आहे. म्हणजेच कर्मचाऱ्यांना 2023 24 पर्यंत एकतर 8 वा वेतन आयोग लागू होईल नाहीतर सातवा आयोग मध्ये सुधारणा केली जाऊ शकते. निश्चितच मीडिया रिपोर्टमध्ये केलेला हा दावा खरा असला तर सरकारी कर्मचाऱ्यांना लवकरच याचा फायदा होणार आहे. नवीन वेतन आयोग लागू झाल्यास किंवा वर्तमान वेतन आयोगात सुधारणा झाल्यास सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात दुपटीने वाढ होणार आहे. याचा फायदा राज्य कर्मचाऱ्यांना देखील होणार आहे.