7th Pay Commission : राज्य कर्मचाऱ्यांसाठी (State Government Employee) एक कामाची बातमी समोर येत आहे. मित्रांनो जस की आपणास ठाऊकच आहे राज्यातील बहुतांशी राज्य कर्मचार्‍यांचे (Government Employee) सेवानिवृत्तीचे वय (Retirement Age) 58 वर्षे आहे.

मात्र वर्ग चार कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे आहे. तसेच केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या (Central Government) देखील सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे आहे. अशा परिस्थितीत आता राज्य कर्मचाऱ्यांच्या सेवा निवृत्तीच्या वयाबाबत राज्य शासन (Government) लवकरच एक मोठा निर्णय घेणार असल्याचा दावा मीडिया रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे.

राज्य शासनातील तमाम मात्र राज्य कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयात वाढ करण्यात येणार आहे. निश्चितच राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय वाढल्यास राज्य कर्मचाऱ्यांना दोन वर्षे अतिरिक्त सेवा बजावता येणार आहे. त्यामुळे राज्य कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक लाभ मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. शिवाय कर्मचाऱ्यांच्या अनुभवाचा देखील राज्य शासनाला फायदा होणार आहे.

मित्रांनो केंद्र शासनाने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे केल्यानंतर देशातील जवळपास 25 राज्यांनी आपल्या राज्यातील राज्य कर्मचार्‍यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे केले आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्र राज्यात कार्यरत असलेल्या राज्य कर्मचाऱ्यांकडून देखील सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे केले जावे अशी मागणी जोर धरू लागली आहे. यासंदर्भात अनेक कर्मचारी संघटनेकडून मागणी करण्यात आली आहे.

नुकतेच 27 सप्टेंबर रोजी राज्य कर्मचार्‍यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे केले जावे याबाबत एक निवेदन सादर केले आहे. त्यामुळे राज्य कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयाबाबत पुन्हा एकदा सर्वत्र चर्चा रंगल्या आहेत. शिवाय आता राज्य शासन देखील राज्य कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयात वाढ करण्याबाबत सकारात्मक असल्याचे सांगितले जात आहे.

खरं पाहता राज्यात अनेक विभागात रिक्त पदे आहेत शिवाय तीन वर्षांपासून कोणतीच मोठी भरती झालेली नसल्याने कर्मचारी लवकर सेवानिवृत्त झाल्यास मोठ्या प्रमाणात रिक्त पदे निर्माण होणार आहेत. अशा परिस्थितीत राज्य शासन राज्य कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयात वाढ करणार असल्याचे सांगितले जात आहे.