7th Pay Commission : मित्रांनो जसे की आपणास ठाऊकच आहे 2005 नंतर महाराष्ट्र शासन (Maharashtra Government) सेवेत रुजू झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांसाठी (Government Employee) जुनी पेन्शन योजना (Old Pension Scheme) बंद करण्यात आली आहे.

अशा परिस्थितीत राज्य शासनाचे कर्मचारी (State Government Employee) गेल्या अनेक दिवसापासून जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी मायबाप शासनाकडे (Government) मागणी करत आहेत. कल्याण डोंबिवली महानगरपालिकामध्ये 2005 पूर्वी रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना देखील शासनाकडून जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी टाळाटाळ केली जात होती. खरं पाहता 2005 नंतर शासन सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना नवीन पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे.

मात्र कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत 2005 पूर्वी रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना देखील जुन्या पेन्शन योजनेचा लाभ मिळत नाहीय. अशा परिस्थितीत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत सेवा बजावणारे कर्मचारी वारंवार जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी शासनाकडे मागणी करत. आता या कर्मचाऱ्यांच्या संदर्भात एक मोठा निर्णय घेतला गेला आहे.

कल्याण डोंबिवली महानगर पालिका कर्मचाऱ्यांची मागणी लक्षात घेऊन नवनिर्वाचित मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे यांनी सकारात्मक दृष्टिकोन बाळगून 2005 पूर्वी शासन सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना म्हणजेच पेन्शन योजना 1982 लागू करण्याचा ऐतिहासिक निर्णय पारित केला आहे. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की हा निर्णय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व कल्याण डोंबिवली पालिकाच्या कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांबरोबर मंगळवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे.

त्याचबरोबर 18 वर्षांपासुन कंत्राटी तत्वावर कार्यरत असणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम सेवेत सामावून घेणेबाबत मोठा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडुन घेण्यात आला आहे. यामुळे निश्चितच काँट्रॅक्टवर काम करणाऱ्या कल्याण डोंबिवली महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना मोठा सुखद धक्का बसला आहे.

मुख्य मंत्री एकनाथ शिंदे यांनी सकारात्मक दृष्टिकोन बाळगून सदर घेतलेल्या निर्णयाचे पालिका कर्मचाऱ्यांकडुन स्वागत करण्यात आले आहे. आता कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत कॉन्ट्रॅक्टवर काम करणारे ड्रायव्हर वाहक तसेच यांना कायमस्वरूपी संत सेवेत विलीन करण्यात आले आहे. यामुळे निश्चितच कल्याण-डोंबिवली महापालिकेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे.