7th Pay Commission : संपूर्ण देशात 31 तारखेला श्रींचे आगमन म्हणजेच गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे. अशा परिस्थितीत राज्यातील तमाम राज्य शासनाच्या (State Government) वेतनधारक तसेच निवृत्तीवेतन धारक कर्मचाऱ्यांसाठी (Government Employee) एक आनंदाची बातमी समोर येत आहे.

महाराष्ट्र शासन (Maharashtra State) वित्त विभागाने 24 ऑगस्ट रोजी एक महत्त्वाचा शासन निर्णय (Government Resolution) निर्गमित करुन राज्य शासनातील तमाम कर्मचाऱ्यांना एक मोठा दिलासा दिला आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र राज्य वित्त विभागाने (Maharashtra State Finance Department) राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांना (State Government Employee) गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ऑगस्ट महिन्यातील वेतन तसेच निवृत्तीवेतन गणेशोत्सवापूर्वी देण्याच्या सूचना केल्या असून या अनुषंगाने शासन निर्णय देखील निर्गमित करण्यात आला आहे.

म्हणजेचं जे वेतन कर्मचाऱ्यांना सप्टेंबर महिन्यात मिळणार होतं ते वेतन कर्मचाऱ्यांना 31 ऑगस्ट पूर्वीचं जारी करण्यात येणार आहे. यामुळे राज्यातील वेतनधारक तसेच निवृत्तीवेतनधारक राज्य कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याची बतावणी होत आहे.

राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांना 30 ऑगस्ट रोजी सुरू होणाऱ्या गणेशोत्सवाचा सण आनंदाने साजरा करता यावा या अनुषंगाने राज्य शासनाकडून ऑगस्ट महिन्यातील पेमेंट ऑगस्ट महिन्यातच देण्याचा मोठा निर्णय घेतला असून या संदर्भात शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. यामुळे राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार असून गणेशोत्सवाचा आनंद घेता येणार असल्याचे सांगितले जात आहे.

मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी येथे नमुद करु इच्छितो की गणेशोत्सव हा सण संपूर्ण भारतात नव्हे नव्हे तर संपूर्ण जगात साजरा केला जातो. आपल्या राज्यात देखील सर्वत्र गणेशोत्सवाची धूम असते. राज्यातील कोकणात मोठ्या प्रमाणात गणेशोत्सव साजरा केला जातो. या सणासाठी मुंबईकडे रवाना झालेले चाकरमानी किंवा कामगार लोक मोठ्या प्रमाणात आपल्या गावाकडे परतत असतात.

अशा परिस्थितीत शासनाने घेतलेला हा मोठा निर्णय राज्य शासनाच्या निवृत्तीवेतन धारक तसेच वेतनधारक कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारा ठरणार आहे. यासंदर्भात मिळालेली अधिक माहिती अशी की, राज्य कर्मचाऱ्यांना वेतन विहीत कालावधीमध्ये अदा करण्यात यावे यासाठी वेतन बिल विहित कालावधीमध्ये सादर करण्याचे आदेश कार्यालय प्रमुखांना दिले आहेत. निश्चितच ऑगस्ट महिन्यातील पेमेंट सप्टेंबर महिन्यात न होता ऑगस्ट महिन्यातचं विशेष म्हणजे गणेशोत्सवाच्या आधी होणार असल्याने गणेशोत्सवानिमित्त शासनाकडून ही एक मोठी भेट कर्मचार्‍यांना दिली गेली असल्याचे सांगितले जात आहे.