7th Pay Commission: नुकत्याच काही दिवसांपूर्वी केंद्र शासनाने (Central Government) केंद्रीय कर्मचाऱ्यांचा (Central Government Employee) डीए वाढीबाबत महत्त्वाचा निर्णय पारित केला असून त्याची अंमलबजावणी देखील सुरू झाली आहे.

अशा परिस्थितीत देशातील अनेक राज्यातील राज्य शासनाने (State Government) देखील आपल्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता वाढीबाबतचा निर्णय घेतला आहे. आता महाराष्ट्र राज्यातील शासन सेवेतील कर्मचारी (State Government Employee) देखील महागाई भत्ता (Dearness Allowance) वाढीबाबत शासनाकडे डोळे वटारून बघत आहेत.

मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, केंद्र शासनातील केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे महाराष्ट्र राज्यातील शासन सेवेतील कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढ जानेवारी महिन्यापासून बाकी आहे. मित्रांनो केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना जानेवारी महिन्यात तीन टक्के डीए वाढ केली होती. राज्य शासनातील कर्मचाऱ्यांना देखील जानेवारी महिन्यापासून डीए वाढ थकबाकीच्या फरकासह लागू करण्यात आली आहे. नुकताच केंद्रीय कर्मचाऱ्यांना जुलै महिन्यापासून चार टक्के महागाई भत्ता वाढविण्यात आला आहे. विशेष म्हणजे सप्टेंबर महिन्यापासून रोखीने डीए वाढीची रक्कम रोखीने मिळणार आहे. यामुळे राज्य शासनातील कर्मचाऱ्यांचा रोष वाढत आहे.

दरम्यान मध्यंतरी झालेल्या सत्ता बदलामुळे निर्णय घेण्यास विलंब होत असल्याचे सांगितले गेले होते. मात्र आता राज्यात नवीन सत्ता स्थापन झाली असून मंत्रिमंडळाचा विस्तार देखील झाला आहे. यामुळे राज्य शासनातील कर्मचाऱ्यांना डीए वाढीचं गिफ्ट लवकरच दिला जाऊ शकतो. दरम्यान राज्य शासनातील कर्मचाऱ्यांनी 20 ऑगस्ट रोजी राज्यव्यापी संपाचे देखील आयोजन केले आहे. राज्य शासनातील कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्या शासनाकडे प्रलंबित असल्याने सदर चा संप आयोजित केला गेला असल्याचे सांगितले जात आहे.

या मागण्यांमध्ये डीएवाढीचा मुद्दा हा प्रमुख असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान जाणकार लोकांच्या मते प्रशासन विस्कळीत होऊ नये यामुळे राज्य शासन संपाच्या आधीच डीए वाढीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ शकते. यामुळे राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांना 20 ऑगस्ट पूर्वी एक मोठे गिफ्ट राज्य शासनाकडून दिलं जाऊ शकतो अशा चर्चांना आता मोठे उधाण आलं आहे. निश्चितच राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांच्या भुवया देखील यावेळी उंचावल्या आहेत. यामुळे 20 ऑगस्ट पूर्वी राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांचा डीए वाढीबाबतचा हा प्रश्न निकाली लागतो की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.